Home अमरावती शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मित्र पक्ष सहित आम्ही रस्त्यावर येऊ, राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित...

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मित्र पक्ष सहित आम्ही रस्त्यावर येऊ, राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे अमरावती येथे आव्हान.

122

आशाताई बच्छाव

IMG_20231114_131543.jpg

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मित्र पक्ष सहित आम्ही रस्त्यावर येऊ, राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे अमरावती येथे आव्हान.
————-
दैनिक युवा मराठा
पी एम देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. शेतकऱ्यांची उत्पादन कमी झाल्या असून खर्च वाढला आहे. परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही त्यामुळे दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी मोर्चा काढून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास आम्ही आणि आमचे मित्र पक्ष ही रस्त्यावर येऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केली. आमदार रोहित पवार हे विदर्भ ते अमरावतीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले जो पवार साहेबांचा दाखला सोशल मीडियावर बाहेर फिरत आहे तो खरा नाही. भाजपा नेहमीच खोट्या गोष्टी पसरवून त्यांचे राजकारण करते त्यांना असत्याचा मार्ग घेऊन सत्तेत येणे एवढाच काय ते समजते
आली सत्ते त आल्यावर सत्तेचा दुरुपयोग करणे एवढाच भाजपला माहित आहे. सामान्य लोकांचे प्रश्न ची मात्र त्यांना काही देणं घेणं नाही. लोकसभेच्या आधी हिंदू मुस्लिम होत नाही म्हणून समजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपा कडून केला जातो मराठा आणि कुणबी ओबीसी सोबतच हिंदू मुस्लिम होण्याचा प्रयत्न केला जाईल व समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपाकडून केल्या जाईल असेही आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले. अजित पवार व शरद पवार परत येतील की नाही तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे, मात्र अजित दादांच्या चेहऱ्याकडे बघून ते नाराज आहे असं जाणवत असून भाजपला लोक नेता पटत नाही असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Previous articleस्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर ही पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाकरता महान कार्य
Next articleचकपिरंजी येथे अनुसूचित जाती आघाडीची भाजपा शाखा कार्यकारणी गठीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.