Home जालना पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवलेले हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवलेले हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला.

132

आशाताई बच्छाव

IMG_20231112_115343.jpg

पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवलेले हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला.
आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

२५ नोव्हेंबरपर्यंत जायकवाडी धरणात पाणी सोंडण्यात यावे,अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन  – सतीश घाटगे

अंबड / घनसावंगी/ जालना,( दिलीप बोंडे)- : समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार जायकवाडी धरणाच्या हक्काचं ८.६०८ टीएमसी पाणी हे तात्काळ सोडण्यात यावे.पश्चिम महाराष्ट्रातील नगर नाशिक भागातील नेत्यांच्या दबावामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी असतानाही ते सोडत नाही.त्यामुळे भाजप नेते तथा समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.५२  वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तब्बल एक तास चाललेले या रास्ता रोको मुळे दुतर्फा वाहनाच्या पाच पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.

आमच्या हक्काचं पाणी कधी सुटेल याची लेखी हमी मिळत नाही,तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही,अशी भूमिका सतीश घाटगे यांनी घेतल्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी दूरध्वनीवरून आश्वासन दिले.मात्र हे आश्वासन आम्हाला मान्य नाही.कधीपर्यंत पाणी सुटेल याची लेखी हमी तुम्ही द्या,त्याशिवाय मी उठणार नाही,असा आक्रमक पवित्रा घाटगे यांनी घेतल्या मुळे महसूल,जलसंपदा विभाग आणि पोलिस प्रशासनाची भंबेरी उडाली.शेवटी पोलिसांनी सतिश घाटगे यांच्या सह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.  यावेळी मागण्याची निवेदन अंबडच्या नायब तहसीलदार धनश्री भालचीम,जलसंपदा विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता काकडे व स.पो.नि.रवींद्र ठाकरे यांना देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.त

Previous articleपश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवलेले हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला.
Next articleजिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यात उपाय योजना लागु करा 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.