आशाताई बच्छाव
जादूटोणा विरोधी कायदा जन संवाद यात्रा निमित्ताने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मार्गदर्शन
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- ऑक्टोबर रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन येथे जादूटोणा विरोधी कायदा जन संवाद यात्रा निमित्ताने ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन अध्यादेश 2013’ संदर्भ नंदिनी जाधव (पुणे )राज्यकार्यकारणी सदस्य यांनी मार्गदर्शन केले.
एफ आय आर दाखल करताना कोणती काळजी घ्यावी, काय टाळावे, पुरावे कोणते द्यावे पंच वेगवेगळे असावे याबाबत पोस्टर चित्रा च्या सहकार्याने कायदा समजावून सांगितला, तर मिलिंद देशमुख यांनी कायदा च्या तरतूदी संदर्भात डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी 17 वर्षे पाठपुरावा केला त्यांची हत्या झाल्यानंतर हा कायदा आठ दिवसांत मंजूर करण्यात आला होता.
आज या कायद्याच्या संदर्भात म्हणावे तसे गुन्हे दाखल केले जात नाहीत जे केले जातात ते एफ आय आर मधील त्रुटी मुळे सुटतात असे सांगितले. भगवान रणदिवे यांच्या सहकार्याने पाण्याचा दिवा पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांनी पेटवून उद्घाटन केले.
प्रास्ताविक प्रा गौतम निकम यांनी केले तर आभार नीता सामंत यांनी मानले ,शहर पोलिस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी उपस्थित होते तसेच डॉ पायल पवार,वैशाली निकम, प्रा विजया चव्हाण, विजया ठाकूर,उमा चव्हाण, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.






