Home अमरावती हिवताप अधिकारी हे पद वारंवार एकाच व्यक्तीला का? कर्मचारी संघटना संतापल्या, बदलना...

हिवताप अधिकारी हे पद वारंवार एकाच व्यक्तीला का? कर्मचारी संघटना संतापल्या, बदलना झाल्यास आंदोलनाचा पवित्र घेणार.

111

आशाताई बच्छाव

Screenshot_20231019-212648_WhatsApp.jpg

हिवताप अधिकारी हे पद वारंवार एकाच व्यक्तीला का? कर्मचारी संघटना संतापल्या, बदलना झाल्यास आंदोलनाचा पवित्र घेणार.
——————————-दैनिक युवा मराठा
अमरावती विभागीय संपादक.तथा ब्युरो चीफ रिपोर्टर.

पी एन देशमुख.
अमरावती. अमरावती जिल्हा हिवताप अधिकारी या पदाचे कामकाज वारंवार एकाच व्यक्तीकडे जात असल्याने हेल्थ फेडरेशनने आक्षेप घेतला असून यंत्रणेत विरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर पदावरील प्रभारी डॉक्टर यांच्या कामकाजा संदर्भात कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत, सदर पदावरील प्रभारी डॉक्टरांच्या कामकाजात बाबत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांना त्या पदावरून तात्काळ प्रभावाने हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिंदे यांनी याबाबत तक्रार केली असून त्यांच्या प्रति जिल्हा परिषदेचे सीईओ, डी एच ओ, आणि अकोला येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयास पाठविले आहेत. त्याचप्रमाणे उपसंचालक कार्याला पाठवले आहेत. त्यांच्या मते सदर पद रिक्त आहे. त्यामुळे या पदाचा कार्यभार डॉ. शरद जोगी यांच्याकडे सोपीनाथ आला आहे. त्यांचे कामकाज योग्य नसल्यामुळे मध्यंतरी आम्ही बदलीची मागणी केली होती. ती पुढे मान्य ही झाली, परंतु त्यांच्या जागेवर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे नियुक्तीनंतर काही दिवसांनी निदान झाल्यामुळे पुन्हा डॉक्टर जोगी यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. या काळात त्यांनी आरोग्य सेवक असलेल्या एका माजी सैनिकाचा अपमान केला असून एका खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांची बदली केली. एवढेच नव्हे तर प्रशिक्षणासाठी पाठवल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेच्या सेवा जेष्ठता यादीतही फेरफार करून नावाची अदलबदल केली. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपी ला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने वेळीच निर्णय घेतला नाही तर हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशन तर ते आंदोलनाचा इशारा देण्याचा आला आहे माझ्या विरोधातील तक्रार ही आकाश बुद्धिने करण्यात आली आहे मला जिल्हा परिषदेच्या यंत्रणा मार्फत काम करावे लागत असले तरी मी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा अधिकारी आहे तरी तक्रारकरते संघटना ही जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांची आहे या संघटनेचा आणि माझा थेट संबंध येत नाही. संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांच्या वास्तव्य मागण्या मी मान्य केला नसल्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात तक्रार सुरू केल्या आहेत. असे डॉक्टर शरद जोगी प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती यांनी म्हटले आहे.

Previous articleदर्यापूर बस स्थानकात बस चालकाकडून पत्रकार आदेश खांडेकर याला मारहाण व शिवीगाळ . —————————–
Next articleआझाद मैदानावर ‘ऑफ्रोह’चे बेमुदत धरणे आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.