Home नांदेड देगलूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साठे चौकातील रस्त्याचे काम खोळंबले विविध ठिकाणी मुतारी तुडुंब...

देगलूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साठे चौकातील रस्त्याचे काम खोळंबले विविध ठिकाणी मुतारी तुडुंब भरल्या.

124

आशाताई बच्छाव

Screenshot_20231019-205647_WhatsApp.jpg

देगलूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साठे चौकातील रस्त्याचे काम खोळंबले विविध ठिकाणी मुतारी तुडुंब भरल्या.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साठे चौकातील रस्त्याचे काम खोळंबले विविध ठिकाणी मुतारी तुडुंब भरल्या देगलूर शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून विविध ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत उभारण्यात आलेल्या मुताऱ्या तुब भरल्या असून याकडे पालिकेवर नियुक्त असलेले प्रशासक कानाडोळा करीत आहेत मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे देगलूर शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून शहरात पुन्हा डुकरांचा कुत्र्यांचा मोकाट जनावरांचा हायदोस आहे देगलूर शहरात मेन मोक्याच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौकात पाईपलाईनचे अथवा नालीसफाई चे काम चालू असून त्यानिमित्ताने खोदण्यात आलेला खड्डा अनेक दिवसापासून उघड्यावर सोडण्यात आल्याने वाहनास अडथळा निर्माण होऊन वाहने रस्त्यावर ठप्प होताना दिसून येतात काम चालू असलेल्या ठिकाणी वाहने वळवण्यासाठी कंत्राटदाराकडून कोणतीही फलक लावण्यात आलेला नाही यामुळे थेट गाड्या खड्ड्यात पडण्याची व माती दगडात कोसळण्याची शक्यता आहे असे असताना पालिकेचे कर्मचारी या बाबीकडे कानाडोळा करीत आहेत एकंदरीत देगलूर शहराची परिस्थिती पाहता अस्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत दयनीय आहे बालिकेच्या प्रशासकावर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती गठीत करावी अशी मागणी सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे
देगलूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे साठे चौकातील रस्त्याचे काम खोळंबले विविध ठिकाणी मुतारी तुडुंब भरल्या

Previous articleदेगलूर तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा ‘च्या माध्यमातून भाजपची पोलखोल.
Next article“देगलूर महाविद्यालय देगलूर मध्ये तक्रार निवारण समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन”.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.