आशाताई बच्छाव
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मा.मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड नांदेड,(संजय कोकेंवार ब्युरो चीफ)- आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मा.मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडी नंतर सर्व संचालकांनी भास्करराव पाटील खतगावकर यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. पाटील यांच्या नांदेड येथील निवासस्थानी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हितचिंतक व कार्यकर्ते यांचा शुभेच्छा देण्यासाठी भास्करराव पाटील खतगावकर यांच्या घरी दिवसभर गर्दी केली होती.निवड झाल्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की यापूर्वीही मी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा दोन वेळेस अध्यक्ष होतो.तिसऱ्यांदा परत माझी निवड माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी बिनविरोध निवड केली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना लवकरच कर्ज देण्यात येईल.असे सांगितले.