आशाताई बच्छाव
नाशिक,(प्रतिनिधी अँड विनया नागरे)- जागृती फाऊंडेशन(नाशिक)यांच्या मार्फत पितृपक्ष निमित्ताने विशेष उपक्रम साजरा करताना जत्रा हॉटेल येथील मदर टेरेसा (प्रेमदान) वृद्धाश्रम मध्ये 120 जेष्ठ व्यक्तींना स्नेहभोजन व फळ वाटप करत सर्व धर्म समभावाचा संदेश दिला या उपक्रमास विशेष अतिथी म्हणून
श्री रोहित पारख आपलं रुग्ण सेवा केंद्र व फिजिओथेरपी स्पेसिलिस्ट(नाशिक) तसेच
श्री सुरेश शिरोडे
नाशिक महानगर पालिकेचे स्वच्छता दूत सदस्य व विजय शिरसाठ सर एअर फोर्स रिटायर्ड ऑफिसर यांचे स्वागत करण्यात आले व आलेल्या सर्व अतिथीचे शॉल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर ग्रुपमधील भगिनी अलकाताई पवार यांचा वाढदिवस एका आगळ्या वेगळ्या पध्द्तीने साजरा करण्यात आला.
जागृती फाऊंडेशन(नाशिक)संस्थेच्या संस्थपिका सौ.ललिता नवघिरे व संस्थापक श्री.प्रशांत शेळके यांनी सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद मानताना सांगितले की आम्ही फक्त कल्पना मांडली पण खरे सूत्रधार तुम्ही सर्व जण म्हणजे खरे आपली जागृती फाऊंडेशन फॅमिली मधील सहभगिनी
करुणा आहेर, अँड.विनया नागरे,मयुरी शुक्ला,शारदा चौहान,छाया कोठावदे, संतोष शेट्टी, विजय सपकाळ ,विशाखा खैरनार, गीता बैरागी,मेघा पाटील, स्नेहा शिंपी,शोभा सावंत, रुपाली वालझाडे, पुनम बर्वे, पल्लवी फगरे, विजय लक्ष्मी गुजर, स्वेता कटारिया, प्रतिभा शिंदे, निलम कुमावत, जयश्री दिवटे, हर्षाली भोसले, संगीता इंगळे,आरती जैन, शरद अफ्रे.गायत्री पवार सुनीता बाविस्कर, दीप्ती कर्डेल, प्रीती बच्छाव, स्मिता रुपवते, माया शिंदे (सिल्वासा), अलका पवार ई. या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानले व यापुढेही प्रत्येक गरजु व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असु असे सांगितले आणि कार्यक्रमाची सुरुवात जागृती फाऊंडेशन(नाशिक)संस्थेच्या संस्थपिका सौ.ललिता नवघिरे यांनी केली व जागृती फाऊंडेशन(नाशिक)संस्थेचे श्री.प्रशांत शेळके यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले आणि जत्रा हॉटेल नाशिक येथील मदर टेरेसा (प्रेमदान) वृद्धाश्रम येते कार्यक्रम आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.






