Home जळगाव बँकेतून काढलेली 3 लाखांची रक्कम पळवली

बँकेतून काढलेली 3 लाखांची रक्कम पळवली

126

आशाताई बच्छाव

Screenshot_20231010-071715_Google.jpg

बँकेतून काढलेली 3 लाखांची रक्कम
पळवली

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – वृद्ध ग्राहकाने बँकेतून काढलेली 3 लाख रूपयांची रोकड असलेली पिशवी दुचाकीला टांगली असताना भामट्याने मोटारसायकलला लटकावलेली पिशवीतील 3 लाखांची रोकड लंपास केल्याचा घटना 7 रोजी घडली असून याप्रकरणी अज्ञात भामट्याच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरीचा हा प्रकार सीासीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून पोलीसांनी चोरट्यांची ओळख पटत असल्यास शहर पोलीसंाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
शहराला लागून असलेल्या ओझर येथील राजेंद्र तान्हीराम वाणी (57) यांनी 7 दुपारी स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडोदा शाखेतून तीन लाख रूपये काढले.हे पैसे त्यांनी प्लास्टीक पिशवीत ठेवले व ती पिशवी त्यांनी आपल्या दुचाकीच्या मागच्या सिटच्याजवळ असलेल्या हुकला लटकावली 3 लाखांची रोकड असलेली पिशवी भामट्याने हातोहात लंपास करीत दुचाकीवर आलेल्या भामट्यासह पोबारा केला. वाणी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी या फुटेजच्या आधारे चोरी करणाऱ्या भामट्यांची ओळख पटत असल्यास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील(मोबा.9850087456), उपनिरीक्षक सुहास आव्हाड (मोबा.8850126718), उपनिरीक्षक योगेश माळी (मोबा.7972005639) व हवालदार योगेश बेलदार (मोबा.7020316335) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केेले आहे.

Previous articleरेल्वेला धडकल्याने एकाचा मृत्यु
Next articleनाशिकच्या प्रेमदान वृध्दाश्रमात पितृपक्षा निमित स्नेहभोजन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.