Home जळगाव 7 हजाराची लाच घेताना करगाव माध्यमिक आश्रम शाळेचा ग्रंथपाल ACB च्या जाळ्यात

7 हजाराची लाच घेताना करगाव माध्यमिक आश्रम शाळेचा ग्रंथपाल ACB च्या जाळ्यात

179

आशाताई बच्छाव

Screenshot_20231010-070537_Google.jpg

7 हजाराची लाच घेताना करगाव माध्यमिक आश्रम शाळेचा ग्रंथपाल ACB च्या जाळ्यात

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी 7000 ची लाच घेताना तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रम शाळेचा ग्रंथपालास जळगांव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दि 6 रोजी ताब्यात घेतले असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तक्रारदार हे माध्यमिक आश्रमशाळा, करगाव ता. चाळीसगाव येथील कर्मचारी असून त्यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी आश्रमशाळेचे ग्रंथपाल श्रीकांत गुलाब पवार (41) रा. करगाव ता. चाळीसगाव यांनी यापूर्वी फोन पेवर 15 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नतीचे थकीत रक्कम 85 हजार 519 रुपये मंजूर करून आणून देतो. त्यासाठी फरकाचा बिलाच्या 16 टक्केप्रमाणे 12 हजार रूपये लागतील असे ग्रंथपाल पवार यांनी सांगितले.त्यामुळे तक्रारदार यांनी जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचून आज दि.6 रोजी दुपारी ग्रंथपाल श्रीकांत पवार यांना तक्रारदाराकडून पहिला हप्ता म्हणून 7 हजार रुपये स्वतः स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय.दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील,हवालदार रविंद्र घुगे,महिला हवालदार शैलाा धनगर, पोना. किशोर महाजन,प्रदीप पोळ,पोकॉ.सचिन चाटे,प्रणेश ठाकूर, सापळा पथक पोना. सुनील वानखेडे,बाळू मराठे, राकेश दुसाणे यांच्या पथकाने केली.

Previous articleवरवट बकाल येथील अतिक्रमणधारकांचा साखळी” उपोषणाचा इशारा
Next articleरेल्वेला धडकल्याने एकाचा मृत्यु
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.