Home जळगाव विद्यार्थ्यांनी स्वतःतील न्यूनगंड कमी करून आपल्या भाग्याचे शिल्पकार बनले पाहिजे – मॅनेजमेंट...

विद्यार्थ्यांनी स्वतःतील न्यूनगंड कमी करून आपल्या भाग्याचे शिल्पकार बनले पाहिजे – मॅनेजमेंट गुरु प्रशांत पुप्पल

148

आशाताई बच्छाव

IMG-20231008-WA0069.jpg

विद्यार्थ्यांनी स्वतःतील न्यूनगंड कमी करून आपल्या भाग्याचे शिल्पकार बनले पाहिजे – मॅनेजमेंट गुरु प्रशांत पुप्पल

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – रामकृष्ण मिशन आश्रम छत्रपती संभाजी नगर यांच्या सहकार्यातून रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था यांच्या द्वारे शहरातील चार महाविद्यालयातून सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख ध्येय निश्चिती कशी करावी या विषयावर मौलिक मार्गदर्शन पर व्याख्यान सत्र 6 व 7 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज, डॉ. अब्दुल कलाम, संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले व इतर अनेक संतांच्या चरित्र वाचनातून मिळतील. यासाठी स्वतःमधील न्यूनगंड कमी करून स्वतःच्या भाग्यचे शिल्पकार बनले पाहिजे. आजच्या तरुणांनी खऱ्या अर्थाने जागे होण्याची गरज आहे. असे विचार मॅनेजमेंट गुरु प्रशांत पुप्पल (पुणे) यांनी आयोजित व्याख्यान प्रसंगी व्यक्त केले. आशिष भावसार याने राज्यसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल त्याचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यासाठी प्राचार्य एस. आर. जाधव, डॉ.प्राचार्य एम. व्ही. बिल्दीकर, प्राचार्य अभिषेक देशमुख, प्राचार्य नितीन बागुल, डॉ.प्राध्यापक राजेंद्र निकम, उपप्राचार्य वसईकर यांच्यासह सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीचे हेमंत साळी, रमेश जानराव, मिलिंद देशमुख, एल. डी. पाटील, हर्षल आंबेकर, दत्तात्रेय असलेकर, राजेंद्र चौधरी, भूषण पाटील, प्रशांत साळी, सागर ढगे, आदित्य साळी यांनी परिश्रम घेतले.