Home अमरावती अमरावती जिल्ह्याचे नवे पालकमंत्री पाटील लवकरच स्वीकारणार पदभार: परंतु जिल्ह्याकडे किती वेळ...

अमरावती जिल्ह्याचे नवे पालकमंत्री पाटील लवकरच स्वीकारणार पदभार: परंतु जिल्ह्याकडे किती वेळ देतील, याबाबत जिल्ह्यातील नागरिकाकडून शंका.

116

आशाताई बच्छाव

Screenshot_20231005-182146_WhatsApp.jpg

अमरावती जिल्ह्याचे नवे पालकमंत्री पाटील लवकरच स्वीकारणार पदभार: परंतु जिल्ह्याकडे किती वेळ देतील, याबाबत जिल्ह्यातील नागरिकाकडून शंका.
——————————-
दैनिक युवा मराठा
अमरावती विभागीय संपादक.
पी एन देशमुख.
अमरावती.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, बुधवारी ही घोषणा केली. त्यामुळे येत्या काळात ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाची सूत्रस्विकारतील. त्यांच्या नियुक्तीमुळे रखडलेले अनेक कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचमुळे अमरावतीसह आणखीन एक जिल्हा त्यांच्या वाटेला आल्याने दोन दोन जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्याकडे किती वेळ देतील. याबाबत शंकाही नागरिकाकडून व्यक्त केल्या जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीपूर्वी जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. गेल्या वर्षाच्या उर्वरित ४ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अमरावतीचे पालकत्व देण्यात आले असले तरी त्यांच्याकडे शासनाने सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री आहे. त्यामुळे ते अमरावती जिल्ह्याकडे किती वेळ देतील याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. आर्थिक वर्ष सुरू होऊन सहा महिन्याचा कालखंड उलटला, पण डीसीपीअसलेल्या जिल्ह्याच्या एकाही यंत्रणेने छदामही खर्च केलेला नाही अशी सध्याची स्थिती आहे.

Previous articleनाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये छताला गळती
Next articleमहात्मा गांधी जयंती निमित सायबर सुरक्षा कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.