Home जळगाव राजमाता जिजाऊ गणेशोत्सव मंडळाचा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरण

राजमाता जिजाऊ गणेशोत्सव मंडळाचा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरण

110

आशाताई बच्छाव

Screenshot_20231005-081540_WhatsApp.jpg

राजमाता जिजाऊ गणेशोत्सव मंडळाचा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरण

जळगांव, नरेंद्र पाटील.

मलकापूर : राजमाता जिजाऊ गणेशोत्सव मंडळ नळगंगा लेआउट हनुमान नगर मलकापूर ग्रामीण च्या वतीने गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारला सायंकाळी पार पडला बक्षीस वितरण समारंभाला अध्यक्षस्थानी अस्तित्व संघटनेचे अध्यक्ष सौ. प्रेमलताताई सोनवणे, प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. उमाताई तायडे प्रमुख उपस्थितीत श्रीमती. मलकापूर ग्रामीण च्या सदस्या सत्यभामाबाई उंबरकार,दैनिक लोकमत चे श्री. हनुमान जगताप, दैनिक मराठा दर्पण चे संपादक श्री. नारायण पानसरे मलकापूर ग्रामीण चे सदस्य श्री बंडूभाऊ बोंबटकार उपस्थित होते या वेळी मंडळाच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये लिंबू चमचा, लंगडी, धावणे (रनिंग), आलुरेस, पोतारेस, संगीत खुर्ची, नृत्य (डान्स) यांचे ५ ते ९ वर्ष मुले,मुली व १० ते १५ वर्ष मुले,मुली या वयोगटात आयोजन केले होते एकूण ८४ पारितोषिक वितरण व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले तसेच
या वेळी प्रमुख उपस्थितीत लाभलेले नुकतेच लोकमत गौरव पुरस्कार ने सन्मानित झालेले दैनिक लोकमत चे प्रतिनिधी श्री हनुमान काका जगताप यांचा मंडळाच्या वतीने नागरी सत्कार घेण्यात आला व मलकापूर नगरीतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले खेळाडू यांना त्यांच्या पालकांसमवेंत सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी आंतरराष्ट्रीय पदक वजेता व बुलढाणा जिल्ह्यातील वेटलिफ्टींग व पॉवरलिफ्टिंग चे प्रशिक्षण देऊन राज्य राष्ट्रीय पातळीचे खेळाडू घडवणारा रामा प्रकाश मेहेसरे यांचा सुध्धा सन्मान मंडळाच्या वतीने घेण्यात आला या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ उमाताई तायडे यांनी आपले अमूल्य असे मार्गदर्शन केले तसेच अध्यक्षीय समारोपात अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष सौ प्रेमलताताई सोनोणे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे भरभरून कौतुक केले संचालन सूर्यकांत उंबरकार यांनी केले व कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कुणाल नारखेडे, राहुल बगाडे, रोहन नारखेडे, अक्षय जवरे, प्रवीण कोल्हे, विक्रम राणे, गणेश वराडे, मयूर तायडे, शरद ठोसर, आकाश लाड, रवींद्र चव्हाण, पवन पाटील, नितिकेश खोडके, सुपेश बोंबटकार व समस्त राजमाता जिजाऊ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ हनुमान नगर मलकापूर ग्रामीण आदींनी परिश्रम घेतले