Home नांदेड पोलीस स्टेशन लोहा येथे स्वच्छता पंधरवाडा उपक्रम राबविण्यात आला

पोलीस स्टेशन लोहा येथे स्वच्छता पंधरवाडा उपक्रम राबविण्यात आला

97

आशाताई बच्छाव

Screenshot_20231003-081607_WhatsApp.jpg

पोलीस स्टेशन लोहा येथे स्वच्छता पंधरवाडा उपक्रम राबविण्यात आला

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

पोलीस स्टेशन लोहा व संत गाडगे महाराज शाळा त्यांच्या वतीने आज रोजी पोलीस स्टेशन लोहा येथे स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

सदर मोहिमेमध्ये शाळेची सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी यांनी भाग घेतला, तसेच शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनीही सहभाग घेतला तर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी ही सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.

पोलीस अधिकारी श्री ओमकांत चिंचोलकर साहेब, श्री संत गाडगे महाराज शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप बोतगिरे सर, उप मुख्याध्यापक श्री बी डी जाधव सर यांच्यासह पोलीस कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी पोनि चिंचोलकर यांनी स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, स्वच्छता म्हणजे काय तसेच स्वच्छता ही आत्मिक, बौद्धिक, वैचारिक आणि परिसरातील अशी असावी. आपले विचार आपली वाणी ही स्वच्छ असावी, आपले राहणे वागणे हे पण स्वच्छ असावे, त्यानंतर आपला परिसर स्वच्छ असावा अशाप्रकारे स्वच्छतेचे महत्व आणि स्वच्छता म्हणजे काय हे विस्तृत पणे पोनि चिंचोलकर यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले.

यावेळी पोलीस स्टेशन तर्फे संत गाडगे महाराज शाळेचे विद्यार्थि व स्टाफचे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल पोलीस स्टेशन लोहा तर्फे आभार मानन्यात आले.

Previous articleसटाणा येथे जय मल्हार युवा मित्र मंडळाचे रक्तदान शिबीर संपन्न
Next articleजूलूसमध्ये आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्या खंडव्याच्या हाश्मी गृपच्या पदाधिकाऱ्यंावर कारवाईची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.