Home नाशिक सटाणा येथे जय मल्हार युवा मित्र मंडळाचे रक्तदान शिबीर संपन्न

सटाणा येथे जय मल्हार युवा मित्र मंडळाचे रक्तदान शिबीर संपन्न

99
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0047.jpg

सटाणा: (जगदिश बधान यांजकडून )-सटाणा येथील भाक्षी रोडवरील जय मल्हार युवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनानिमित्त मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून आदर्श घालून दिला. सामाजिक कार्यकर्ते योगेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या जय मल्हार युवा मित्र मंडळाच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.विशेष बाब म्हणजे मंडळाकडून अनावश्यक व अनाठाई खर्च न करता वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.चालू वर्षी देखील मंडळाने हा आदर्श कायम ठेवत पहिल्या दिवसापासून दररोज विविध स्पर्धांचे आयोजन केले.या स्पर्धांमध्ये शालेय मुले मुली,युवक युवती व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.स्पर्धेतील प्रथम विजेत्यास सव्वा आठ भार वजनाची गणेश मूर्ती बक्षीस म्हणून देण्यात आली व द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना बक्षीस म्हणून सायकल देण्यात आली.दररोज स्पर्धा झाल्यानंतर तात्काळ विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.शेवटचे दोन दिवस नृत्य स्पर्धा पार पडली तर विसर्जनाच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर मंडळाच्या सर्व सदस्यांनी रक्तदान केले.गेल्या सहा वर्षापासून मंडळाकडून ही आदर्श वाटचाल सुरू असून याबाबत मंडळाचे विशेष कौतुक होताना दिसते.
फोटो ओळी-सटाणा:येथील भाक्षी रोडवरील जय मल्हार युवा मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी उपस्थित अध्यक्ष योगेश सूर्यवंशी व सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here