आशाताई बच्छाव
समता सैनिक दलाची चाळीसगाव शाखेने आयोजित केलेली संघर्ष रॅलीसाठी उत्साहात संपन्न….
शहर तसेच ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी सहभाग घेवून रॅली केली यशस्वी केली….
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – समता सैनिक दल चाळीसगाव शाखेने 30 सप्टेंबर , शनिवार रोजी आयोजित केलेली संघर्ष रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली. तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण परिसरातून चार ते पाच हजार लोकांनी रॅलीत सहभाग घेतला .
मुख्य प्रचारक धर्मभुषण बागुल यांच्या नेतृत्वात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रेल्वे स्टेशन येथून रॅलीची सुरुवात झाली. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती. या प्रसंगी निळे झेंडे घेवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. अतिशय चोख व शिस्तबध्द रीतीने निघालेल्या रॅली ने चाळीसगावकरांचे लक्ष वेधून घेतले.
तहसील कचेरी येथे रॅली चे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलतांना धर्मभुषण बागुल यांनी जातीप्रथा नष्ट करणे हे समता सैनिक दलाचे ध्येय असून भारतीय संविधान , लोकशाही व्यवस्थाच भारताला महाशक्ती बनवू शकते त्यासाठी भारतीय जनतेने डोळ्यात तेल घालून जागृत राहणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले. या वेळी बोलतांना आरक्षण , कंत्राटी पद्धतीने कामगार भरती , खाजगीकरण , जातीयवाद , डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक याबाबत धर्मभुषण बागुल यांनी परखड विचार व्यक्त केले.
या रॅलीत महिलांची संख्या लक्षणीय होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती स्मारकास महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वप्नील जाधव यांच्या घोषणा आणि सूचनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तहसील कचेरी येथे चौकात फक्त एक व्यक्ती उभा राहू शकेल असे स्टेज तयार करण्यात आले होते.
संघर्ष रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रचारक स्वप्नील जाधव , भाईदास गोलाईत, तालुका प्रचारक नितीन मरसाळे, सौ सोनालीताई लोखंडे , ज्ञानेश्वर बागुल, विशाल पगारे , दीपक बागुल , शिवाजी शिंदे , अवधेश बागुल,सचिन मोरे , राजू अहिरे ,सौ. माया अहिरे , भुषण नवगीरे , जीवन जाधव ,तसेच विष्णू जाधव , बाबा पगारे , जेष्ठ सैनिक महेंद्रभाऊ जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्हा प्रचारक विजय निकम जळगाव , किशोर डोंगरे हे उपस्थित होते.
स्वप्नील जाधव ,नितीन मरसाळे, दीपक बागुल , विशाल केदार व विष्णू जाधव यांचे सह तरुण सहकाऱ्यांनी रॅलीचे चोख नियोजन केले होते.शहर पोलिस स्टेशन तसेच वाहतूक पोलीस शाखेने योग्य बंदोबस्त ठेवला होता.






