Home नांदेड वीज अंगावर कोसळून पन्नास वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू ▪️ हिमायतनगर तालुक्यातील एकंबा...

वीज अंगावर कोसळून पन्नास वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू ▪️ हिमायतनगर तालुक्यातील एकंबा शिवारातील दुर्दैवी घटना

161

आशाताई बच्छाव

IMG-20230929-WA0065.jpg

▪️ वीज अंगावर कोसळून पन्नास वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
▪️ हिमायतनगर तालुक्यातील एकंबा शिवारातील दुर्दैवी घटना

नांदेड जिल्हा प्रतिनिधि

हिमायतनगर तालुक्यातील एकंबा येथे शेतात काम करत असलेल्या पन्नास वर्षीय शेतमजूर महिलेच्या अंगावर विज कोसळल्याने सदर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २९ रोजी दुपारी तीन वाजताचे दरम्यान घडली.

सध्या मूग तोडणी सह खरीप पिकातील तण कढणीचे काम सुरू आहे. दि. २९ रोजी शेती कामासाठी गेलेली पन्नास वर्षीय महिला शेती काम करत होती. दरम्यान दुपारी तीन वाजताचे सुमारास अचानक आभाळात ढग जमू लागले.

कांहीं वेळात मेघ गर्जनेसह पावसास प्रारंभ झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी शांताबाई पुंजाराम खंदारे (वय ५०) रा. एकंबा ता. हिमायतनगर ही महिला एका झाडाखाली आश्रयास बसली असता त्यांच्या अंगावर विज कोसळली त्यात शांताबाई या जागीच मृत पावल्या.

हिमायतनगरचे तहसीलदार आदित्य शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा करून सदरील अहवाल पुढील कार्यवाहीस्तव शासनाकडे पाठवला असल्याचे सांगितले.

Previous articleसावधान..”आज शेवटची संधी” पुन्हा पैसे जाळण्याची आफत येऊ देऊ नका…!
Next articleनाशिकरोडला ईदमिलादुनबी सण उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.