Home नाशिक म वि प्र संचलित नांदुर्डी विद्यालयात मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत...

म वि प्र संचलित नांदुर्डी विद्यालयात मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

347

आशाताई बच्छाव

IMG-20230926-WA0069.jpg

म वि प्र संचलित नांदुर्डी विद्यालयात मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

मेरी माटी मेरा देश या शहीद जवानाच्या कुटुंबीयांचा सत्कार करणे तसेच वीरांना नमन करणे यासाठी भारत सरकारने राबविलेल्या या मोहिमेंतर्गत जनता विद्यालय नांदुर्डी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी घराघरातून मातीचे संकलन करून आणले व संकलन केलेली माती एका कलश मध्ये एकत्रित केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक डावरे डी ए, पर्यवेक्षक बिन्नर बी पी तसेच ज्येष्ठ शिक्षक शिंदे आर आर, शिंदे टी जी ,निफाडे बी के ,गावित जी सी, मोतींगे एस आर ,शिंदे डी पी यांच्या शुभहस्ते कलश पूजन करण्यात आले.यावेळी विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले‌. सकाळी प्रभात फेरीचे आयोजन शहिदांना नमन करण्यात आले .दुपार सत्रात नांदुर्डी गावचे सुपुत्र शहीद मेजर किशोर गंगाधर शिंदे यांचे घरी जाऊन मुख्याध्यापक डावरे डी ए, निफाडे बी के, आहेर एस आर, संजय खापरे आदींनी शहीद किशोर गंगाधर शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना दिली. याप्रसंगी मेजर शिंदे यांच्या मातेस शाल व आरती संग्रहाचे पुस्तक देऊन येथे गौरव करण्यात आला.

Previous articleनिफाडला समर्थ महिला शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ
Next articleटाकळी विंचूर विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.