Home नाशिक श्री क्षेत्र हिरापुर (दरसवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताह एकनाथ भागवत पारायण सोहळ्यास...

श्री क्षेत्र हिरापुर (दरसवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताह एकनाथ भागवत पारायण सोहळ्यास प्रारंभ —

544

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0065.jpg

श्री क्षेत्र हिरापुर (दरसवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताह
एकनाथ भागवत पारायण सोहळ्यास प्रारंभ —

महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार हजेरी लावणार

दैनिक युवा मराठा
चांदवड प्रतिनिधी -लक्ष्मण आवारे

श्री क्षेत्र हिरापुर (दरसवाडी) येथे वै.ह.भ.प. देवराम बाबा चव्हाण, वै.ह.भ.प.दत्तात्रय महाराज चव्हाण, वै.ह.भ.प. विष्णू महाराज कर्पे यांच्या आशीर्वादाने श्री. ह.भ.प. रवींद्र महाराज चव्हाण आळंदीकर यांच्या मार्गदर्शन आणि व ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह व एकनाथ भागवत पारायण सोहळा, मिती भाद्रपद १० शनिवार २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या पवित्र काळात होत असून पंचक्रोशीतील सर्व भाविक-भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ दरसवाडी हिरापूर यांनी केले आहे.
कलशपूजनः वैष्णवभूषण सुजितजी महाराज देवरगावकर व समाधान जोशी (गुरु) तसेच समस्त गावकरी मंडळी (हिरापुर) यांच्या हस्ते ब्रह्ममुहूर्तावर कलश पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे
दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ९ ते ११ भागवत पारायण, सायं. ६ ते ७ सामुदायिक हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन होईल.
सप्ताहातील कीर्तनाची रुपरेषा पुढील प्रमाणे
शनिवार २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.सुवर्णाताई महाराज जमधडे (येवला), कीर्तनसेवा-: दीपक एकनाथ डोंगरे, रविवार २४ रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव) कीर्तनसेवा- संपत वाळीबा चव्हाण, सोमवार २५ रोजी ह. भ. प. कृष्णा महाराज कमानकर (भेंडाळी) कीर्तनसेवा– बाबुराव महादू शिंदे, मंगळवार २६ रोजी
ह.भ.प रमेश महाराज गांगुर्डे (कळमदरे) ,कीर्तनसेवा– नामदेव शंकर डोंगरे, बुधवार २७ रोजी ह.भ.प समाधान महाराज पगार (भाटगाव ) कीर्तनसेवा- मधुकर दगुजी वाघाडे, गुरुवार २८ रोजी ह.भ.प.अनंत महाराज कजवाडेकर (कजवाडे) कीर्तनसेवा ज्ञानेश्वर भाऊसाहेब बागुल शुकवार २९ रोजी ह. भ. प. श्रावण महाराज जगताप (विसापूर) कीर्तन सेवा -भास्कर पर्वतराव निफाडे स्मरणार्थ,
शनिवार ३० रोजी ह.भ.प.बाळासाहेब महाराज रंजाळे (श्रीरामपूर) कीर्तनसेवा: बंडू नाना चव्हाण, शनिवार दि. ३०/९/२०२३ रोजी सकाळी ७ ते ९ दिंडी प्रदक्षिणा होईल व सकाळी ९ ते ११ या वेळेत ह. भ. प. बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे काल्याचे किर्तन होईल. व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
ग्रंथवाचक- अरुण थोरात, उमेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, रामदास चव्हाण,गायनाचार्य ह.भ.प. निलेश महाराज काळे ह.भ.प.नवनाथ महाराज बत्ताशे, मृदुंगाचार्य ह.भ.प. रविंद्र महाराज चव्हाण, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बागल, ह.भ.प. किशोर महाराज कहडने, हार्मोनियम -ह.भ.प.लक्ष्मण बाबा चव्हाण ह.भ.प.सोनू बाबा गोराणे, चोपदार- संजय चंद्रभान डोंगरे श्री.मोहनराव आनंदा बढे,
हरिपाठ व किर्तन नेतृत्व: रमेश चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, मदनराव बढे, सोनु बाबा गोराणे, पोपट कोंडाजी चव्हाण, शिवाजी चव्हाण, शांताराम बागल, प्रभाकर चव्हाण, अंकुश चव्हाण, समाधान लामखडे, किशोर कहडणे, अभिजित गांगुर्डे, किरण चव्हाण, नंदु चव्हाण, अनुराग बागल. सुनिल महानुभाव, सोमनाथ चव्हाण, सागर शिदे, जनार्दन चव्हाण, बंडू चव्हाण, नरहरी भंडारे, दिनकर पवार, किसन कांगुणे, बाळू नागरे, दिनकर चव्हाण.

Previous articleविद्यापीठ सलग्न १६७ महाविद्यालयाचे”नॅक” मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शिक्षणिक भवितत्त्व धोक्याचे संकेत कुल सचिवांचे पत्र.
Next articleखेडले झुंगे विद्यालयात पर्यावरण पूरक गणपती बाप्पाचे विसर्जन-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.