Home जळगाव विवाहीत महिलेला अनोळखी इसमाकडून मोबाईलवर अश्लिल मँसेजस

विवाहीत महिलेला अनोळखी इसमाकडून मोबाईलवर अश्लिल मँसेजस

237

आशाताई बच्छाव

Screenshot_20230923-183241_Google.jpg

विवाहीत महिलेला अनोळखी इसमाकडून मोबाईलवर अश्लिल मँसेजस
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – तालुक्यातील एका गावातील 34 वर्षीय विवाहीतेचे अन्य लोकांशी अनैतिक संबंध आहेत असे अश्लिल मेसेज पाठवून त्रास देण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील 34 वर्षीय महिला कुटुंबासह राहते. तिच्या मोबाईलवरील व्हॉटसअपवर 15 जुन पासून वेळेावेळी अनोळखी व्यक्ती आपली ओळख लपवून तीन मोबाईल नंबरवरून फोन करतो.यावेळी अश्लिल संभाषण करतो.या प्रकाराने धास्तावलेल्या महीलेने कुठेही वाच्याता केली नाही.विशेष म्हणजे या अनोळखी व्यक्तीने महिेलेच्या अन्य नातेवाईकांच्या मोबाईलवर देखील या महिलेची बदनामी करणारा मेसेज पाठवले.दि.22 रोजी सकाळी 7.12 वाजता या पीडित महिलेला पुन्हा त्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला व त्याने महिलेस लज्जा उत्पन्न होईल असा अश्लिल संवाद केला.
या प्रकाराने त्रस्त झालेल्या या महिलेने ग्रामीण पोलीसात धाव घेत पोलीसांना आपबित्ती सांगितली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादंवि कलम 509,500 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या विकृत अनोळखी व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.