Home जळगाव १४ भुईकोट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्यासाठी शासनाने काढलेल्या जी आर ची तहसील कार्यालयासमोर...

१४ भुईकोट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्यासाठी शासनाने काढलेल्या जी आर ची तहसील कार्यालयासमोर शिवभक्तांच्या वतीने होळी

62
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230923-184009_WhatsApp.jpg

१४ भुईकोट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्यासाठी शासनाने काढलेल्या जी आर ची तहसील कार्यालयासमोर शिवभक्तांच्या वतीने होळी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – राज्य सरकारला गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करता येत नाही पण ३ जिल्ह्याच्या १४ गड किल्ल्यांवरती शासनाने शौचालय बांधायचा जी आर काढल्याने शिवभक्तामध्ये या विरोधात संतपाची लाट असून राज्य सरकारने शिवभक्तांच्या भावना भडकविण्याचे काम केले आहे. १४ भुईकोट गट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्याचा शासनाने काढलेल्या जी आर तात्काळ मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे. चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर जी आर ची शिवभक्तांच्या वतीने दि २३ रोजी होळी करण्यात आली.
गट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्याचा शासनाने जी आर काढल्याने शिवभक्त राज्यात एकाही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्शिवाद घेऊन राज्य करायचे आणि महाराजांनी स्वराज्यात उभे केलेल्या गडकिल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास धुळीस मिळविण्याचा मनसुबा आखायचा हा ढोंगीपणा शासनाच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यानी बंद करावा तुमचे खरे चेहरे आता उघडे पडले आहे, सांस्कृतीक मंत्री मगलप्रभात लोढा यांची हिम्मत ऐवढी वाढली की ते थेट ३ जिल्ह्यातील १४ भुईकोट किल्ल्यांवरती शौचालय बांधायला निघालेत . घेतलेला निर्णय निषेधार्थ असून राज्य सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, शासन ठरवून छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचा विध्वंस करायला निघाले आहे,शासनाचे कटकारस्थान शिवरायांचे मावळे कदापी सफल होऊ देणार नाही. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने काढलेला जी आर तात्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यातील शिवभक्त आक्रमक आंदोलन करतील याची झळ शासनाला बसल्याशिवाय राहणार नाही,शासनाच्या सांस्कृतिक विभागाने काढलेला जी आर मुख्यमंत्री यांनी तात्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यातील शिवभक्त राज्यभर आक्रमक आंदोलन करतील असा इशारा शासनाला चाळीसगाव येथील शिवभक्तांनी दिला आहे.

Previous articleविवाहीत महिलेला अनोळखी इसमाकडून मोबाईलवर अश्लिल मँसेजस
Next articleगौरी ऐवजी जिजाऊ सावित्रीचे पूजन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here