आशाताई बच्छाव
लोहा शहरात न.पा.च्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम उत्साहात संपन्न ; अनेक शाळेनी सहभाग नोंदवून काढली प्रभात फेरी
लोहा/प्रतिनिधी
अंबादास पाटिल पवार
लोहा शहरात न.पा.च्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमात लोहा शहरातील अनेक शाळेनी सहभाग नोंदवून काढली प्रभात फेरी.
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत लोहा नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बळीदान दिले शूर वीरांना , शहिदांना वीरांगणानना श्रद्धांजली वाहण्यासाठी भव्य अमरत कलश यातल्या दि. २०-९-२०२३ रोजी सकाळी ११ वाजता लोहा न.पा.च्या प्रगणांतून पंचप्राण शपथ घेऊन सुरुवात केली.
सदरील यात्रा लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरून भाजी मंडई, पोलिस स्टेशनच्या मागील परीसर , शिवकल्याण नगर, कै.नळगे शाळा परीसर जुना लोहा तसेच सर्व प्रभागातून विद्यार्थ्यांनी रॅली काढून देशभक्तीपर नारे देण्यात आले.
तसेच या रॅलीत नागरिकांनी सहभाग नोंदवून कलशामध्ये माती अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालय, कै. विश्वनाथराव नळगे विद्यालय, नारायणा इंग्लिश स्कूल यांनी सहभाग नोंदवून प्रभात फेरी काढली.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोहा न.पा. चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, गंगाधर दळवी, चंद्रकांत सुतार,सुरज राठोड,श्री अंकले, रावसाहेब नळगे, वैजनाथ शेटे, शंकर वाघमारे, निलेश चव्हाण, दांगटे, गालफाडे आदींनी परिश्रम घेतले.






