Home नाशिक प्राचार्य सी डी रोटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित होणार 

प्राचार्य सी डी रोटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित होणार 

188

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0060.jpg

प्राचार्य सी डी रोटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित होणार

२४ सप्टेंबर रोजी औरंगाबादकर सभागृह नाशिक ला पुरस्कार वितरण

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

रयत शिक्षण संस्थेच्या वनसगाव तालुका निफाड येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची आदर्श प्राचार्य, विठ्ठल रखुमाई ग्रुपचे जेष्ठ सदस्य तथा वारकरी मंच महाराष्ट्र राज्य निफाड तालुका कार्याध्यक्ष सी डी रोटे यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान गिताभुमी, गिताई नगर, अभोणा (कळवण) नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संयोजक खंडु मोरे यांनी दिली आहे.
प्राचार्य सी डी रोटे यांना २४ सप्टेंबर रोजी औरंगाबादकर सभागृह नाशिक येथे दुपारी १२ वाजता
मान्यवरांच्या हस्ते कृतिशील आदर्श शिक्षक हा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे असे निवड समितीचे अध्यक्ष शिवराज नरवडे, व्यवस्थापकीय संपादक रमजु तांबोळी यांनी सांगितले आहे.
शून्यातून विश्व उभारणे हा वाक् प्रयोग अनेकदा सहज केला जातो. पण खरोखर शून्यातून विश्व उभारणे ही काय चीज असते याचे प्रभावी उदाहरण म्हणजे प्राचार्य सी डी रोटे. अध्यापन कौशल्याची आणि शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्र, वारकरी संप्रदाय, सामाजिक बांधिलकी जपत दातृत्वाचा गुण अशी एक वेगळी ताकद असून, शैक्षणिक व सामाजिकता आदीं बरोबर ज्ञान विकासाला हातभार लावण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून परिस्थिती समोर हार न मानता आपण शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करत असल्याबद्दल कृतिशील आदर्श शिक्षक सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ सुजित जी गुंजाळ, मा.सभापती सुवर्णा ताई जगताप, ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त स्मिताताई कुलकर्णी , लासलगाव खरेदी विक्री संघाचे संचालक तथा सारोळे खुर्द चे सरपंच दत्तोपंत डुकरे,
वंजारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाबुराव पाटील सानप, वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश कोंडे महाराज देशमुख आळंदीकर, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे सर, अशोकराव पगार सर, पोलीस उपनिरीक्षक निकम साहेब, लासलगाव विकास संस्थेचे माजी चेअरमन राजा बाबा होळकर, शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष मनीष शिंदे, उपाध्यक्ष डॉ योगेश डुंबरे, डॉ चंद्रशेखर सातभाई, संचालक धनंजय डुंबरे, एकनाथ दादा शिंदे, मुख्याध्यापक एस के लभडे ,प्राचार्य गोरखनाथ तेलोरे, समीर देवडे सर, प्राचार्य कैलास गवळी मुख्याध्यापिका मंजुश्री रायते,सौ मनिषा भोर, मुख्याध्यापक आनंदा राजगुरू, विकास आप्पा रायते आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleलोह्यात कै मधुकर पारेकर यांच्या पुण्य स्मृती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
Next articleदेवगाव अंगणवाडी केंद्रात पोषण अभियान कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.