Home नांदेड लोह्यात कै मधुकर पारेकर यांच्या पुण्य स्मृती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

लोह्यात कै मधुकर पारेकर यांच्या पुण्य स्मृती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

125

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0026.jpg

लोह्यात कै मधुकर पारेकर यांच्या पुण्य स्मृती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

लोहा शहरातील सर्वात मोठे कुटुंब असलेल्या पारेकर परिवारातील स्व.मधुकर नारायण पारेकर यांच्या प्रथम स्मृती निमित्ताने अनाठायी खर्चाला फाटा देत पारेकर कुटुंबीयांनी शिव छत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना माजी आ रोहिदासराव चव्हाण , कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, सेवानिवृत्त उपअभियंता प्रभाकर पारेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
.विद्युत वितरण कंपनीतील सेवानिवृत्त अभियंता स्व मधुकर नारायण पारेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त लोह्यातील शिव छत्रपती विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप माजी आ रोहिदास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपकार्यकरी अभियंता प्रभाकर पारेकर , मुख्याध्यापक दामोदर वडजे, ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर पारेकर, बालाजी पारेकर, मुख्याध्यापक एच जी पवार,भारत पारेकर, गिरीश पारेकर, गोविंद ढगे, श्रीमती सरोजा पारेकर, श्वेता पारेकर
यासह शाळेतील शिक्षक -कर्मचारी उपस्थित होते.आर आर पारेकर यांच्या पुढाकाराने अनाठायी खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला व पुढेही असाच उपक्रम सुरू ठेवण्याचे जाहीर केले
स्व.मधुकर पारेकर व पारेकर कुटुंबाच्या कार्याचा गौरव माजी आ रोहिदास चव्हाण यांनी केला .सेवानिवृत्त उपअभियंता प्रभाकर पारेकर यांनी त्यांच्या बंधूंच्या आठवणी सांगितल्या.मुख्याध्यापक दामोदर वडजे ,हरिहर धुतमल यांनी मनोगत व्यक्त केले आयोजक राहुल पारेकर यांनी काका मधुकर यांच्या आठवणी प्रास्ताविकात सांगितल्या.अतिशय सुरेख संचलन बालाजी गवाले यांनी तर आभार आर आर पिठ्ठलवाड यांनी मानले.

Previous articleशहरातील सी. सी. टीव्ही कॅमेरे बंद.
Next articleप्राचार्य सी डी रोटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित होणार 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.