Home सोलापूर माढा महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीसाठी ५ कोटीची आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

माढा महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीसाठी ५ कोटीची आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

121

आशाताई बच्छाव

IMG-20230919-WA0079.jpg

माढा महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीसाठी ५ कोटीची आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

सोलापूर
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा व महाळुंग श्रीपुर नगरपंचायती अंतर्गत विकासकामांसाठी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ५ कोटी रूपयांची मागणी केली आहे. माढा विधानसभा मतदार संघातील माढा व महाळुंग श्रीपुर नगरपंचायती अंतर्गत डांबरी व काँक्रीट रस्ते, गटारी, सभामंडप इत्यादी कामांच्या माध्यमातून परिसराचा विकास व्हावा या उद्देशाने आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभा मतदार संघातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या विविध प्रभागातील २६ कामांसाठी व माढा नगरपंचायतीसाठी ६ कामांसाठी एकूण ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करून प्रस्तावित कामे मार्गी लावण्याचे सुचना दिल्या आहेत. तसेच अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत मोडनिंब (२), बेंबळे, सुरली या गावातील विविध कामांसाठी २५ लाखांच्या निधीची मागणीही करण्यात आली आहे.

Previous articleफेसबुकवर बिझनेस करणा-यांनो सावधान   
Next articleसामाजिक कार्यकर्ते धीरज हाके यांना राजे होळकर सन्मान पुरस्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.