Home अमरावती राणा दातांचे बेताल वक्तव्य; १०० कोटीचा अब्रू नुकसानाचा दावा ठोकणार?,आ. यशोमती ठाकूर...

राणा दातांचे बेताल वक्तव्य; १०० कोटीचा अब्रू नुकसानाचा दावा ठोकणार?,आ. यशोमती ठाकूर यांची रोखठोक भूमिका.

117

आशाताई बच्छाव

Screenshot_20230914-203807_WhatsApp.jpg

राणा दातांचे बेताल वक्तव्य; १०० कोटीचा अब्रू नुकसानाचा दावा ठोकणार?,आ. यशोमती ठाकूर यांची रोखठोक भूमिका.
——————————-
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर अमरावती
मागील अर्थात २०१९च्या लोकसभा निवडणुकी त मी राणा यांच्याकडून क** नोटा घेऊन विरोधकांचा प्रचार केला असा खोटा, बिन बुडाचा आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा राणा यांनी हा आरोप सिद्ध करावा, अन्यथा त्यांच्या विरोधात आपण १०० कोटीचा अब्रू नुकसानाच्या दावा ठोकणार असल्याची माहिती अमरावती दिवसा मतदार संघाचे आमदार यशोमती ठाकूर यांनी या आरोपाला प्रतिउत्तर देताना प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आमदार यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या, ही अतिशय घाणेरडी माणस आहेत. त्यांनी जात चोरली ही वस्तुस्थिती आहे, ते जात चोर आहेत, हे अख्ख्या अमरावतीजिल्ह्याला माहिती आहे. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात घाण पसरवायचे काम केले आहे. त्यांची लायकी तरी काय आहे. मी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून क** नोटा घेतल्या आणि दुसऱ्याचा प्रचार केला हे त्यांनी सिद्ध करावे. नाही ते खाली गेले. चित्रपट नट-नट्यांना कार्यक्रमात आणायचे. त्यांना नातवायचे हेच उद्योग त्यांनी आजवर केले आहे. खोटे बिन बुडाचे आरोप करण्यापूर्वी त्यांची नेमकी जात कोणती? त्यांचा नेमका पक्ष कोणता? हे त्यांनी जाहीर करावे, असा सवाल ऑड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. कॅमेरा पुढे होता अभिनय करणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणंही गैर आहे, असा उपरोधिक सवाल करून त्या मनाला की, जात प्रमाणपत्र खरं की खोटं हा खटला न्यायालयात प्रलंबित असताना व निवडणुकीत जास्त खर्च केल्याचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सुरू असताना त्यांना नेमका आशीर्वाद कोणाचा? मी भाजप त्यांना का पाठीशी घालते, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला त्यांच्या मतदारसंघात जाऊन आपण खरे बोललो हा घाव राणा दाम्पत्यांच
जिव्हारी लागला. म्हणूनच हा राजकीय क
उठला आहे. म्हणूनच ते अशी घाणेरडी गरड ओकत आहेत, अशी टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली. अब्रू नुकसानी बाबत अद्याप पर्यंत कोणतीही नोटीस किंवा कायदेशीर कागदपत्र मिळाले नाही. जे खरे आहे ते खरे आहे त्यात कोणतीही काडी मात्र खोटे आहेच त्यात काडी मात्र खोटी नाही असे त्यांनी म्हटले.

 

 

Previous articleलाखोच्या दुचाकीची आठ ते दहा हजारात विक्री, गुन्हे शाखेच्या युनिट ची महत्त्वाची कारवाई.
Next articleभारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा.नितिनजी गडकरी यांनी दिपाली व अंजली राठोड यांना दिला चर्चेसाठी वेळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.