Home नाशिक बाभुळगाव कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी केले ग्रामीण मूल्यांकन

बाभुळगाव कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी केले ग्रामीण मूल्यांकन

139

आशाताई बच्छाव

IMG-20230824-WA0021.jpg

बाभुळगाव कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी केले ग्रामीण मूल्यांकन

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

येवला तालुक्यातील कोटमगांव येथे कृषि महाविद्यालय बाभुळगाव बी.एससी अ‍ॅग्रीच्या चौथ्या वर्षातील कृषि कन्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कायार्नुभव) उपक्रमातंर्गत ग्रामीण मूल्यांकन केले.या प्रसंगी सरपंच सौ.आशाताई कोटमे, उपसरपंच सौ.मनिषा माळी , माजी सरपंच सौ.संध्या कोटमे, ग्रामसेवक गणेश रोकडे, ग्रा.सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी विद्यार्थिनींनी ग्रामीण मूल्यांकन केले तसेच ग्रामस्थांना गाव नकाशा , गतिशीलता नकाशा , महिला पुरूष लोकसंख्येची टक्केवारी, साक्षरतेचे प्रमाण , लागवडीखालील क्षेत्र व व्यावसायिकतेचे प्रमाण याबद्दल माहीती दिली.हे सर्व कृषिदूतांनी विविध रंगांची रांगोळी काढून प्रदर्शित केले .या निमित्ताने धार्मिक स्थळ, विद्यालये, दळणवळण तसेच लोकसंख्या इत्यादींची माहिती सहजतीने मिळू शकते ही माहिती लोकांना रांगोळीच्या कलाप्रदर्शनातून पटवून दिले.यासाठी कृषी विद्यार्थिनी ईश्वरी कदम, धनश्री चोथवे,अंकिता गवांदे, पुजा गायकवाड,राशी बागडे,निकिता जगताप, गायत्री गायगोळ,स्वाती खैरे, प्रतिक्षा गावडे यांनी चांगल्या रीतीने कार्य पार पाडले तसेच यासाठी ग्रामस्थांचे योग्य ते सहकार्य लाभले.

Previous articleवारकरी मंच महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग कार्याध्यक्षपदी हभप केशव महाराज भुजाडे
Next articleकिर्लोस्कर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन चंदनाच्या झाडांची चोरी, ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.