Home नाशिक ओझर येथील प्रशांत भरवीरकर यांना पीएच.डी प्रदान

ओझर येथील प्रशांत भरवीरकर यांना पीएच.डी प्रदान

161

आशाताई बच्छाव

IMG-20230820-WA0026.jpg

ओझर येथील प्रशांत भरवीरकर यांना पीएच.डी प्रदान

नाशिक जिल्ह्यातील संतांच्या चरित्रपर वाङ्मयाचा अभ्यास’ या विषयावरील संशोधन

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

के टी एच एम महाविद्यालय नाशिक येथील मराठी संशोधन केंद्रातील विद्यार्थी व ओझर गावचे भूमिपुत्र प्रशांत दामोदर भरवीरकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी (विद्यावाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली. ‘नाशिक जिल्ह्यातील संतांच्या चरित्रपर वाङ्मयाचा अभ्यास’ या विषयावरील संशोधनासाठी सटाणा महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. दिलीप पुंडलिक पवार यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे विद्यापीठ येथे झालेल्या मौखिकीसाठी सुप्रसिद्ध साहित्यिक व नांदेड विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ.केशव सखाराम देशमुख, पुणे विद्यापीठ मराठी विभागप्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यावाचस्पती पदवीबाबत मविप्रचे सरचिटणीस अँड. नितीन ठाकरे, केटीएचएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.डी. दरेकर, डॉ. प्रभाकर देसाई, सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधने, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व ज्येष्ठ पत्रकार संजय वाघ, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर, हेमंत भरवीरकर आदींनी अभिनंदन केले.

Previous articleविनामुल्य ॲम्बुलन्सच्या वर्धापन दिनानिमित्त चालकाचा सत्कार
Next articleलेखन करत रहा आपली कविता आपल्याला एक दिवस ओळख देईल—प्रा.वा.ना.आंधळे’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.