Home नाशिक जनता विद्यालय नांदुर्डी येथे शालेय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न

जनता विद्यालय नांदुर्डी येथे शालेय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न

172

आशाताई बच्छाव

IMG-20230818-WA0049.jpg

जनता विद्यालय नांदुर्डी येथे शालेय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न                                           दैनिक युवा मराठा

रामभाऊ आवारे निफाड

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय नांदुर्डी येथे आज गुरुवार दिनांक १७/८/२०२३ रोजी मंत्री मंडळाची बैठक संपन्न झाली .विद्यालयाचे पर्यवेक्षक बिन्नर बी पी. यांनी निवडून आलेल्या मंत्री मंडळ सदस्यांचे स्वागत व अभिनंदन केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सर्व मंत्र्यांना आपल्या मंत्री पदाची जबाबदारी काय असते आणि ती जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडायची तसेच कोणती खबरदारी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले .मंत्री म्हणून तुम्ही कोणकोणत्या बाबींकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे याविषयी सविस्तर माहिती दिली.अध्यक्ष श्री.डावरे डी .ए .यांनी सर्व मंत्र्यांची ओळख करून घेतली आणि सर्व मंत्र्यांना आपल्या कामाविषयी विविध उदाहरणे देऊन प्रत्येक मंत्र्याला आपण ज्या खात्याचे मंत्री आहात त्या खात्याची जबाबदारी काय त्या खात्याला तुम्ही कशा पद्धतीने दाद द्यायची ,विद्यार्थ्यांच्या अडचणी शाळेच्या छोट्या मोठ्या अडचणी समजून घेऊन आपल्या परीने अडचणी आपण कशा सोडवायच्या या विषयी मार्ग दर्शन केले . विद्यालयाची पंतप्रधान कुमारी साक्षी जेउघाले इयत्ता १० वी या विद्यार्थिनीने पंतप्रधान या नात्याने सर्व मंत्र्यांकडून जबाबदारीने काम पूर्ण करून घेईल व विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी माझ्या मंत्री मंडळातील मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या हितासाठी पर्यवेक्षक साहेब व मुख्याध्यापक साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग योग्य पद्धतीने करेल असे आश्वासन देऊन उपस्थितांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने मीटिंग संपल्याचे घोषित केले.

Previous articleसंग्रामपूर तालुक्याला मिळाले अमोल बनसोडेच्या रूपात निवासी तालुका कृषि अधिकारी !
Next articleममदापूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.