आशाताई बच्छाव
शहादा जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्टाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न
शहादा (अँड विनया नागरे )
शहादा वकील संघाकडून शहादा येथील हॉटेल पटेल रेसिडेन्सी हॉल मध्ये दि.४ जुलै २०२३ रोजी रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रौप्य महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश न्या.सी.एस.दातीर साहेब तर प्रमुख पाहुणे बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य ॲड.अमोल सावंत,सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.बी.सावळे,नंदुरबार जिल्हा कोर्टाचे जिल्हा सरकारी वकील ॲड.विनोद गोसावी,तळोदा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर.जी.वाणी,शहादा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.जसराज संचेती,उपाध्यक्ष ॲड.आनंदराव निकम आदी उपस्थित होते.
शहादा येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयास मंगळवार दि.४जुलै २०२३ रोजी २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि.४जुलै २०२३ रोजी रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलतांना शहादा जिल्हा व सत्र न्यायाधीश दातीर साहेबांनी रौप्य महोत्सव दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की,शहादा कोर्टाची नवीन इमारतसाठी वकील वर्ग एकसंघ राहिला तर नक्कीच नवीन इमारत होईल व त्यात आम्हा न्यायाधिश वर्गालाही काम करायला आवडेल.सद्याच्या कोर्ट हॉल ची परिस्थिती बिकट आहे.अनेक वेळा काम करतांना अनेक अडचणी येतात त्यात विजेचा लपंडाव सुरूच असतो.शहादा कोर्टावर प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत, अनेक जेष्ठ विधिज्ञ आहेत असे सांगत शहादा कोर्टाचा अनुभव विशद केला.
यावेळी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.बी.सावळे यांनी उपस्थित वकिलांना मार्गदर्शन करत शहादा न्यायालयात जिल्हा कोर्ट व एस.डी.कोर्ट आणण्यासाठीचे जेष्ठ विधीज्ञा यांनी केलेले योगदानाबद्दल माहिती देत शहादा कोर्टाचा इतिहास सांगितला.
यावेळी प्रमुख पाहुणे बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य ॲड.अमोल सावंत यांनी सांगितले की, शहादा न्यायालयाची नवीन इमारत लवकरच उभी केली जाईल व त्याचे उदघाटन देखील लवकरच होईल असे सांगत ई-फायलिंग साठीचे लागणारी सर्व व्यवस्था लवकर पूर्ण केली जाणार असून बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून कॉम्प्युटर व लागणारी सर्व सामुद्री उपलब्ध करुन दिली जाईल,त्यासाठी स्वतंत्र रूम मध्ये ई फायलिंग सुरू केली जाईल तेथे एका प्रशिक्षित कर्मचारी ची बार कॉन्सिल कडून नियुक्ती केली जाईल असे सांगत कोणत्याही परिस्थितीत नवीन इमारत व ई-फायलिंग व्यवस्था लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील व पूर्ण करेल असे आश्वासन दिले.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात केली व त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयास २५ वर्ष पूर्ण झाले म्हणून केक कापून वाढदिवस साजरा केला.रौप्य महोत्सव कार्यक्रमास शहादा कोर्टाचे न्यायिक वर्ग न्या.बी.एन.अरबाड,न्या.यू. एन.पाटील,न्या.व्ही.व्ही. निवघेकर,न्या.वाय.जी.दुबे, न्या.एम.बी.पाटील,न्या.एस.आर.पाटील मॅडम तसेच तळोदा वकील संघाचे अध्यक्ष तसेच शहादा वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ,वकील वर्ग आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाची प्रस्तावना शहादा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.आनंदराव निकम,सूत्रसंचालन सचिव ॲड.बी.एस.बिरारे तर आभार सह सचिव ॲड.कल्पना पाटील मॅडम यांनी मानले.






