Home नाशिक नाशिकरोडला बाजार भरतो भर रस्त्यावर

नाशिकरोडला बाजार भरतो भर रस्त्यावर

333

आशाताई बच्छाव

Screenshot_20230705-194113_WhatsApp.jpg

इम्तियाज अत्तार
नाशिक रोड :– नाशिक रोड येथे भरणारा सोमवार बाजार हा महानगरपालिके च्या अधिकृत जागेत न भरता रस्तावर भरतो स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका नाशिक रोड येथील अतिक्रमण विभागात तक्रार हि केली परंतु प्रशासनाला या बाबत काहि हि देणेघेणे नाही असे काहिसा हा प्रकार आहे महानगरपालिके चा अतिक्रमण विभाग हा कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याचे दिसून येत असून या बाजारा ठिकाणी नागरिक रहातात. काहि व्यापारी त्यांचा स्वताःच्या अधिकृत जागेत व्यवसाय करतात अतिक्रमणा मुळे त्यांच्या दुकाना समोर भाजीपाला विक्रेते बसतात या वरुन अनेक वेळा वादविवाद होतात. महात्मा गांधी पुतळा ते घोलप वाडी हा रस्ता खुप वर्दळिचा असून ह्या मार्गावर अनेक रुग्णवाहिका जातात, आणि नाशिक रोड वरुन भगुर, देवळाली कॅम्प व देशाचे सैनिक यांची वहाने या मार्गावरून मार्गक्रमण करतात, इतरांचे तर सोडाच पण स्थानिक नागरिकां पैकि जर एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी ही रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही हि बाब महापालिके च्या निदर्शनास आणून दिली तरी हि प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे आणि जर अतिक्रमणामुळे एखाद्या व्यक्तीला जर आपला जीव गमवावा लागला तर महापालिका प्रशासन याची जबाबदारी घेईल का? हा प्रश्न निर्माण होत आहे ते म्हणतात ना झोपलेल्या मानसाला झोपेतून जागे करता येत पण झोपेचे सोंग घेतलेल्याला झोपेतुन जागे करण अवघड आहे अशी काहीशी परिस्थिती महापालिका प्रशासनाची झाली आहे आता तरी प्रशासन जागे होईल का हि एक शंका नागरिकांना पडली आहे

Previous articleप्रा.नारायण पांचाळ यांना पीएच.डी.पदवी प्रदान
Next articleजागृती फाऊंडेशनच्या सतर्कतेमुळे मुलगी पोहचली आपल्या घरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.