आशाताई बच्छाव
लातूर जिल्ह्यात शिवसेना (उध्दव ठाकरे गटाच्या ) नियुक्त्या जोरात सुरु! लातूर, (पवन कदम ब्युरो चीफ)-
राज्यामध्ये राष्ट्रवादी चा बंड चालू असताना सर्व कार्यकर्ते अजित पवार की शरद पवार यांच्यात अडकले असताना, शिवसेना ( ठाकरे गट) आपली ताकत एकवटुन मराठवाड्यात आपली नियुक्ती करत आहे, एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि उध्दव ठाकरेंवर संकट कोसळला. आधी सारखी संघटना उभी करायची म्हणून आता लातूर उपजिल्हा प्रमुख पदी बजरंग दादा जाधव यांची निवड करण्यात आली आहे तर सहसंपर्क पदी संतोष सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच धाराशिव मध्ये सुध्दा महत्वाचे बदल करण्यात आले आहेत
जिल्हा अध्यक्ष: रणजित पाटील
उपजिल्हा प्रमुख : चेतन बोराडे व प्रदीप मेटे
जिल्हा संघटक : दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे .
आता मराठवाड्यातील जनता ठाकरेंना किती साथ देते हे मात्र नक्की बघण्या सारखं आहे.






