Home गडचिरोली गुरू शिवाय जीवनात कोणताही मार्ग नाही भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे...

गुरू शिवाय जीवनात कोणताही मार्ग नाही भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

163

आशाताई बच्छाव

IMG-20230704-WA0070.jpg

गुरू शिवाय जीवनात कोणताही मार्ग नाही
भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

कुरखेडा येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

कुरखेडा/गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) :-

जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याचे योग्य मार्ग दाखवणारे म्हणजे गुरु होय. दरवर्षी गुरुच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी हा उत्सव आपण साजरा करीत आहोत. मानवी जीवनातील गुरुच्या महत्वाला साधुसंतानी व ऋषीमुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अति उच्च कोटीचे आहे. त्यामुळे जीवनात आपण गुरूंचा आदर करायला हवा, गुरु शिवाय जीवनात कोणताही मार्ग नाही, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले. कुरखेडा येथे काल दि 3 जुलै रोजी आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गुरू पौर्णिमेच्या निमित्याने विनोद बिहारी महाराज ( डोंगरगाव) हे कुरखेडा येथे आले असता कुरखेडा येथील प्रतिष्ठित व्यापारी पुंडलिकजी तोंडरे यांच्या निवासस्थानी महाराजांच्या उपस्थितीत गुरू पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगिताताई पिपरे यांनी गुरू पूजन केले व गुरूचा आशीर्वाद घेतला.

याप्रसंगी पुंडलिक तोंडरे व त्यांचे कुटुंबीय गुरू पौर्णिमा उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी माजी जिप सभापती नानाभाऊ नाकाडे, जिप चे माजी कृषी सभापती रमेश बारसागडे, भाजपचे गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, आत्माराम कुथे, प्रकाश बारसागडे, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे व त्यांच्या पत्नी, सुखदेव लांजेवार, कावळे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, कोमल बारसागडे, अर्चना निंबोड, अंजली उरकुडे तसेच कुरखेडा येथील नागरिक, महिला सहभागी झाले होते. गुरू पौर्णिमा उत्सवात सहभागी नागरिक व महिलांनी गुरू पूजन केले व गुरूंचे दर्शन घेतले.

Previous articleनाशिकमध्ये आषाढी एकादशी निमित कार्यक्रम संपन्न                 
Next articleजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दयनीय अवस्थेबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव शिंदे यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.