Home सोलापूर आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी संमेलन उत्साहात

आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी संमेलन उत्साहात

129

आशाताई बच्छाव

Screenshot_20230703-211454_WhatsApp.jpg

आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी संमेलन उत्साहात
युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

अकलूज
मोदी @ 9 अंतर्गत माळशिरस तालुका व माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील येणारी गावे यांचे लाभार्थी संमेलन अकलूज येथे उत्साहात पार पडले याप्रसंगी आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी विविध योजनांची माहिती देत, कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावरील सक्षमपणे काम करावे असे आवाहन केले. यावेळेस आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य कार्यकर्त्यांनी सरल अॅप डाऊनलोड करून भाजपाची सदस्य नोंदणी करून घेतली. माळशिरस व माढा तालुक्यातील आढावा बैठकीतील कार्यकर्त्यांचे प्रश्न पुढच्या महिनाभरापर्यंत मंत्रालय स्तरावरून सुटतील.आ मोहिते पाटील यांनी गेल्या नऊ वर्षात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याचा आढावा सांगितला. या बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेले उपक्रम केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राबवलेल्या विविध कार्यक्रमाबाबत यावेळी चर्चा झाली.

Previous articleउदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनई येथील तरुणांचे पंढरपूर स्वच्छता अभियान
Next articleमालेगाव  मेंढपाळांसाठी सामूहिक वन दावे मंजूर करण्याची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.