Home गडचिरोली भाजप महिला आघाडीच्या वतीने सोनापूर- कॉम्प्लेक्स वार्डात घर- घर चलो महा जनसंपर्क...

भाजप महिला आघाडीच्या वतीने सोनापूर- कॉम्प्लेक्स वार्डात घर- घर चलो महा जनसंपर्क अभियान

131

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0030.jpg

भाजप महिला आघाडीच्या वतीने सोनापूर- कॉम्प्लेक्स वार्डात घर- घर चलो महा जनसंपर्क अभियान

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):-

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने गडचिरोली शहरातील सोनापूर- कॉम्प्लेक्स वार्डातील पंचवटी नगर मधील बुथ क्र. 117, 118 व 119 येथील प्रत्येक घरामध्ये भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात घर-घर चलो महा जनसंपर्क अभियान राबविण्यात आले.

यावेळी सोनापूर- कॉम्प्लेक्स वार्डातील पंचवटी नगरातील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना केंद्रातील मोदी सरकारने 9 वर्षाच्या कालावधीत केलेली चांगली लोकोपयोगी कामे , शासनाचे चांगले निर्णय व विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच शासनाच्या घरकुल, शौचालय, गरीब कल्याण तसेच किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधान मोदी सरकारच्या चांगल्या कार्याची व विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी लाभार्थी महिलांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले.

याप्रसंगी महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री तथा शक्ती केंद्र प्रमुख वर्षाताई शेडमाके, शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष तथा सोनापूर कॉम्प्लेक्स वार्डाचे बुथ प्रमुख विवेक बैस, महिला आघाडी च्या शहर उपाध्यक्ष ज्योतीताई बागडे, शहर सचिव नीताताई बैस उपस्थित होते.

Previous articleदावचवाडीला योगेश्वर विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा संपन्न—
Next articleचंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.