Home जळगाव मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत ज्ञानेश्वर आमले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 50 लाखाचा धनादेश...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत ज्ञानेश्वर आमले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 50 लाखाचा धनादेश वितरित

135

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0035.jpg

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत

ज्ञानेश्वर आमले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 50 लाखाचा धनादेश वितरित

जळगाव, नरेश पाटील : शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जळगांव येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव व जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, जळगांव या कार्यालयाकडून  रोजगार  व स्वयंरोजगारासाठी राबविण्यात येणा-या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती  कार्यक्रम योजनेमध्ये लाभ घेतलेले श्री ज्ञानेश्वर विठ्ठल आमले, रा. खडके, ता. भुसावळ यांना फलॉय ॲश ब्रिक्स या उत्पादनासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भुसावळ या शाखेने ५० लाख रुपये एवढे कर्ज मंजुर  केले. तसेच त्यांना १७.५० लाख रुपये एवढे अनुदान शासनाकडुन मिळणार आहे. श्री. आमले यांना ५० लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

जिल्ह्यातील युवक व युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेमध्ये रोजगार व स्वंयरोजगारासाठी cmegp.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा, तसेच योजनेच्या अधिक  माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी ग्रामोद्योग, शासकीय आयटीआयजवळ, जळगांव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, श्री. चेतन पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Previous articleमाजी आमदार रोहिदास चव्हाण साहेबच विधानसभा निवडणूक लढवणार
Next articleधार्मिक सोहळ्यातील पोलिसांचा हस्तक्षेप कमी करा, बंदोबस्ताच्या नावाखाली होतोय भाविकांना त्रास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.