Home नांदेड माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेबच विधानसभा निवडणूक लढवणार

माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेबच विधानसभा निवडणूक लढवणार

117
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0034.jpg

माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेबच विधानसभा निवडणूक लढवणार
अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधी
लोहा कंधार मतदारसंघात काही पक्षाचे नेते मंडळी द्वेषापोटी विनाकारण आफवांचे पेव आणत आहेत.लोहा कंधार मतदार संघाचे सलग दोन टर्म प्रतिनिधित्व करत संपूर्ण जिल्हा भगवामय करत नांदेड जिल्ह्याची धुरा सांभाळणारे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते,माजी आमदार रोहिदासराव चव्हाण साहेबांच्या नावाचा अपप्रचार करत आहे परंतु पक्षाचा आदेश घेऊन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे लोहा कंधार मतदार संघाचे तिकीट घेऊन माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेबच निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन नवनाथ बापू चव्हाण लोहा कंधार मित्रपरिवार च्या वतीने करण्यात आले आहे.
माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब हे १९८० पासून तळागाळातील,गोरगरीब, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचलेले एकमेव शिवसेना पक्षातील निष्ठावंत लोहा कंधार मतदारसंघातील नेतृत्व असुन त्यांच्या वर विरोधकांकडून चिखलफेक करून स्वतः चे नांव मोठे करण्यासाठी करत आहेत.माजी आमदार रोहिदास चव्हाण पक्ष निष्ठा,संयम, निष्कलंक, चारित्र्य संपन्न व पुर्वीपासून पक्षाच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणारे वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणारे , अजूनही शहरासह व लोहा कंधार मतदार संघ सहित नांदेड लातूर व परभणी जिल्ह्यातील जनतेशी अतिशय जवळीकता असणारे एकमेव खंबीर नेतृत्व आहे. हजारो युवकांना नागरिकांना राजकारण्यांना समाजकारण्यांना त्यांनी घडवले काळानूरुप अनेकांनी त्यांची साथ सोडली तरीही ते डगमगले नाहीत.परंतू सद्या काही पक्षातील विघ्नसंतोषी लोक, विरोधक स्वतः ची पोळी भाजून घेण्यासाठी जाणीवपुर्वक माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेबांच्या नावाचा अपप्रचार करत आहेत.लोहा कंधार मतदार संघात काही पक्षाचे नेते मंडळी द्वेषापोटी रोहिदास चव्हाण हे विधान सभेची लढविणार नसल्याच्या अफवांचे पेव आणत आहेत,अफवा पसरवत आहेत परंतु त्यांच्या अफवांना पक्षातील व लोहा कंधार मतदारसंघातील लोकांनीं विरोधकांच्या अफवांना बळी पडू नये.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते,माजी आमदार तथा लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण साहेब पक्षाचा आदेश घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोहा कंधार मतदार संघाचे उमेदवारी घेऊन माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेबच निवडणूक लढवणार असल्याचे नवनाथ बापू चव्हाण मित्रपरिवार लोहा-कंधारच्या वतीने सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here