Home सामाजिक पंढरपूर येथे फिनोलेक्स कंपनी,हरिकृपा डिजीटल व स्वराज्य संघटनेच्या वतीने पोलिसांना रेनकोट व...

पंढरपूर येथे फिनोलेक्स कंपनी,हरिकृपा डिजीटल व स्वराज्य संघटनेच्या वतीने पोलिसांना रेनकोट व वारकऱ्यांना बॅग वाटप–

144

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0029.jpg

पंढरपूर येथे फिनोलेक्स कंपनी,हरिकृपा डिजीटल व स्वराज्य संघटनेच्या वतीने पोलिसांना रेनकोट व वारकऱ्यांना बॅग वाटप–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व मुख्य महासचिव कमलेश देवा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वारकऱ्यांसाठी एक बॅग व पोलिसांना रेनकोट दिला जातो. याही वर्षी वारकऱ्यांची सेवा करण्याचा योग स्वराज्य संघटनेला आला असून
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना व फिनोलेक्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट व वारकऱ्यांसाठी बॅग वाटप करण्यात आल्या.
यावेळी पंढरपूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत तसेच फुगे सर तर फिनोलेक्स कंपनी च्या वतीने स्टेट हेड महाराष्ट्र व गोवा विश्वजीत हरगुडे, असिस्टंट मॅनेजर गोपाळ आदोने व अजित खटावकर तसेच संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, सोलापूर जिल्हाध्यक्ष दिनेश काटकर, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ ज्योती शेटे, पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष कैलास कारंडे, तालुका सदस्य संजय चव्हाण शिवलिंग वसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

*वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा*
फिनोलेक्स कंपनी व हरीकृपा डिजिटल तसेच स्वराज्य संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे सर व राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे (देवा) यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे सालाबादाप्रमाणे यावेळीही पोलीसांना रेनकोट व वारकऱ्यांना बॅग वाटप करण्यात आली असून वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.
*धनश्रीताई उत्पात -विश्वस्त तथा राज्य संपर्कप्रमुख*

Previous articleगडचिरोली येथे महा अंनिस शाखेतर्फे सामाजिक न्याय दिवस संपन्न
Next articleकुंदेवाडी ला स्वामी विवेकानंद विद्यालयात अवतरली पंढरी याची देह याची डोळा हाच तो दिंडी सोहळा हा प्रसंग प्रत्यक्षात अनुभवला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.