Home नांदेड संजय जोशी यांच्या उप शहर प्रमुखपदाचा राजीनामा

संजय जोशी यांच्या उप शहर प्रमुखपदाचा राजीनामा

196

आशाताई बच्छाव

IMG-20230623-WA0040.jpg

संजय जोशी यांच्या उप शहर प्रमुखपदाचा राजीनामा

देगलूर तालुका प्रतिनिधी, गजानन शिंदे

देगलूर उ. बा. ठाकरे शिवसेना उप शहर प्रमुख संजय जोशी वयाच्या आठव्या वर्षांपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आजपर्यंत पूर्ण निष्टने शिवसैनिक म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करीत पक्ष कसे वाढेल या साठी काम करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असे.
काल झालेल्या नवीन पद वाटपात संजय जोशी यांची दाखल न घेता नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या पैशाची खैरात करणाऱ्या व ज्याच्या जवळ चार चाकी वाहन आहे अशा लोकांना पदाची खैरात केल्यामुळे मी संजय दत्तात्रय जोशी उप शहरप्रमुख पदाचा राजीनामा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्याकडे पाठविले असल्याचे निवेदणाद्वारे कळविण्यात आले.
सविस्तर माहिती अशी कि, वयाच्या आठव्या वर्षी प्रभागातील शाखाप्रमुख ते उप शहरप्रमुख हा प्रवास बतीस वर्षाचा असून गेल्या दोन वर्षपासून संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांना वारंवार विनंती करूनही कोणत्याही नेत्यानि माझी साधी दाखल सुद्धा घेतली नही.मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्यामुळे मी फक्त शिवसैनिक म्हूणन काम करणार असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

Previous articleशिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कार्यवाही करा – छावा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
Next articleव-हाणे प्रकरणात प्रशासनाचा पुणेहून पुणतांब्याला जाण्याचा “वेळकाढू”कारनामा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.