Home अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू’ ट्रॅप’; एसीबीची कारवाई.

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू’ ट्रॅप’; एसीबीची कारवाई.

225

आशाताई बच्छाव

Screenshot_20230622-205347_WhatsApp.jpg

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बडे बाबू’ ट्रॅप’; एसीबीची कारवाई.
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन.
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
वैद्यकीय प्रतिकृतीचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात १३ हजार रुपयाची लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ट्रॅप करण्यात जून रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय स्थिती माध्यमिक विभागातील कक्ष क्रमांक चार मध्ये त्याने लाच स्वीकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. रुपेश प्रताप सिंग ठाकूर (३३) असे लाचखोर बडे बाबू च नाव आहे. यातील तक्रारदार हे वाशिम जिल्ह्यातील एक कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलावर मुंबई येथे उपचार झाला त्यांनी वडिलांच्या ३.३७ लाख रुपयाचे वैद्यकीय प्रतिकृतीचे बिल मंजुरीसाठी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात टाकले ते मंजूर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक रुपेश ठाकूर हा १५ हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार त्या लिपी त्यांनी अमरावती एसीबी कडे नोंदवली तक्रारीची २१ जून रोजी पडताळणी केली. परताळणी दरम्यान ठाकुर ने बाकीची मागणी करून १३ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली ते निष्पन्न झाले. व लगेचच त्याला त्याच्याच कार्यालयात लाचीची ती रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. व त्याच्याविरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश कुमार धंदे व अमोल कडू यांच्या नेतृत्वातील अमलदार नंदकिशोर गुल्हाने आशिष जांबवडे शैलेश कडू चालक पीएसआय सतीश चंद्रकांत जन बंधूंनी केली.

Previous articleखासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते गौरक्षण जवळ दुसऱ्या अंडर ब्रिजचे भूमिपूजन …..
Next articleशिवसेना वर्धापन दिनी तिवसा तालुकाध्यक्ष यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.