आशाताई बच्छाव
आ. बबनदादा शिंदे यांच्या हस्ते दारफळ येथे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.
युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप
माढा तालुक्यातील दारफळ (सि) येथे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन अंगीकृत व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत दारफळ येथील गावठाणात सिना नदीच्या उजव्या तीरावर मारुती मंदिराजवळ २६९.५९ लक्ष रुपयांचे सुरक्षा भिंत व जलजीवन मिशन अंतर्गत उद्धरण नलिका व वितरण व्यवस्था तसेच महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विभाग कब्रस्थान लोकार्पण व विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच सेवानिवृत्त नागरिकांचा सत्कार समारंभ करण्यात आला. प्रसंगी आ. शिंदे यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी कायम कटिबध्द आहे. आपल्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासकामे झाली न आहेत यापुढील काळात देखील अनेक विकासकामे होतील असा विश्वास यावेळी आ. बबनदादा शिंदे यांनी दिला. तसेच सेवानिवृत्त नागरिकांचा सन्मान आ. शिंदे यांनी करून त्यांना पुढील आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.






