Home नाशिक एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत लासलगाव (कृषीनगर) अंगणवाडी च्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय योग दिन...

एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत लासलगाव (कृषीनगर) अंगणवाडी च्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा–

161

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0025.jpg

एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत लासलगाव (कृषीनगर) अंगणवाडी च्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत लासलगाव (कृषीनगर) अंगणवाडी च्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.योगा शिक्षक कंचन ब्रम्हेचा आणि निर्मल लुंकड यांनी उपस्थित मनोज ब्रम्हेचा,प्रमोद कांकरीया ,हरीश साबद्रा ,संजय धाडीवाल ,अर्चना परदेशी ,प्रेरणा लुणावत ,कविता पाटील इ.मार्गदर्शन करताना सांगितले की सन २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिवस २१ जून ला साजरा करतात. दररोज योगा केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते.आजच्या धावपळीच्या जीवनात आपण योगाच्या माध्यमातून आपले शरीर आणि मन निरोगी ठेवले पाहिजे. योगामुळे आपण मोठ मोठ्या आजारावर मात करू शकतो.तसेच मानसिक ताणतणाव सुद्धा कमी होतो. आपण योगाच्या फायद्याची गणना करु शकत नाही. आपण आपल्या संस्कृती चा वारसा पूढे नेऊन योगाचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे.तसेच विश्व ने माना ,योग का लोहा,योग ने दुनिया का,मन मोहा ।
प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे आणि पर्यवेक्षिका गिताजंली ढिकले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सरते शेवटी अर्चना डुंंबरे यांनी आभार मानले.

Previous articleआ. बबनदादा शिंदे यांच्या हस्ते दारफळ येथे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.
Next articleटेनिस क्रिकेट असोसिएशनच्या तालुकास्तरावर तालुका प्रमुखाची होणार निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.