Home अमरावती शरद पवार हे गद्दारीचे आदी पुरुष, आज त्यांचा…; भाजपा खासदार अनिल बोलण्याचा...

शरद पवार हे गद्दारीचे आदी पुरुष, आज त्यांचा…; भाजपा खासदार अनिल बोलण्याचा खोचक टोला.

148

आशाताई बच्छाव

Screenshot_20230620-221851_WhatsApp.jpg

शरद पवार हे गद्दारीचे आदी पुरुष, आज त्यांचा…; भाजपा खासदार अनिल बोलण्याचा खोचक टोला.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
कोण गद्दार आहे त्याचा विचार करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज केक कापून पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करा असे खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडाला आज एक वर्ष झाला असून हा दिवस गद्दार दिन, खोके दिवस म्हणून साजरा करावा अशी मागणी विरोधकांनी केली होती इतकेच नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या गटाकडून आजच्या दिवशी ठिकठिकाणी सत्ताधारी भाजप व शिवसेना विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट शरद पवार वर खोचक टीका केली. खासदार अनिल बोंडे म्हणाले की शिवसेनेतून हिंदुत्वाचा विचार घेऊन चाळीस आमदारांनी उठाव केला ते कद्दार नाही तर स्वाभिमानी आहेत., जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गद्दार दिन साजरा करत आहे, त्यांनी आज गद्दारदींनी ऐवजी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करावा. कारण महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून पहिल्यांदाच कोणी सरकार स्थापन केलं असेल तर ते राष्ट्रवादीचे नेते आहे. त्यामुळे थोडाफोडीचा राजकारणांचे शरद पवार हे आदी पुरुष आहेत. त्यामुळे कोण गद्दार आहे याचा विचार करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज केक कापून साहेबांचा वाढदिवस साजरा करा असं त्यांनी म्हटले. शिंदे फडणवीस सरकार ला आज एक वर्ष पूर्ण झाले याचा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर खोक्याची प्रतिकृती उभारून पन्नास खोके एकदम ओके म्हणत आज गद्दार दिन साजरा करण्यात आला. मुंबईतही राष्ट्रवादी भावना बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आंदोलन करत खोके खोके घोषणाबाजी केली. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. या राज्यात लोकशाही राहिली आहे काय? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दळतशाहीचा विरोधत लढत राहणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहे व या कारणासाठी आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. “महाराष्ट्र कबीर झुका है, ना कभी झुकेगा”… मोडेल पण वाकणार नाही जे गद्दार असतील त्यांना गद्दार म्हणायची ताकद माझ्यात आहे असं सुप्रिया सुळे यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

Previous articleजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वाडी-वसतीवर शासन आपल्या दारीची उत्सुकता
Next articleएकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचल बांगडी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.