आशाताई बच्छाव
जव्हार मध्ये,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा
—-उध्दव ठाकरे गट शिवसैनिकांकडून जल्लोष.
शिवसेनेचा बहरता वटवृक्ष पालघर
जव्हार शहरात १९जून २०२३ हा शिवसेना पक्षाचा ५७ वा वर्धापन दिन शहरातील गांधी चौक येथे दिमाखात पार पडला. ह्या वर्धापन दिनानिमित्त असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून शिवसेनेचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उप तालुका प्रमुख चित्रांगण घोलप यांनी शिवसेनेचा इतिहास शिवसैनिकांसमोर मांडला.त्यात शिवसेनेची स्थापना कशी झाली? कोणत्या बिकट परिस्थितीतून शिवसेना कशी ठाम उभी राहिली याचे विस्तृत वर्णन चित्रांगण घोलप यांनी केले. सन- १९६६ साली महाराष्ट्रात हिंदू हृदयसम्राट बाळा साहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष उभारला. त्यावेळी अवघ्या १५ कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची मुहूर्तमेढ रोवली.त्या अंकुराचा आता शिवसेना पक्षाचा बहरता वटवृक्ष झाला आहे.बदलत्या काळात शिवसेनेची समिकरणे,ध्येय,धोरणे बदलत गेली.परंतु शिवसेना पक्ष आजच्या घडीला हि टिकून आहे.बाळासाहेबांचे विचार आजच्या शिवसैनिकांना सदैव प्रेरणा देतात. नजीकच्या काळात शिवसेनेत राजकीय स्थितत्तरे झाली.परंतु बाळासाहेबांच्या विचारांची नाळ तरुणांशी जुळली आहे.
यावेळी गांधी चौकात जेष्ठ शिवसैनिक अनिल तमोरे यांच्या हस्ते भगवा ध्वजा रोहण करण्यात आले. ह्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन शिवसेनेचे शहर प्रमुख परेश पटेल यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी विक्रमगड विधानसभा समन्वयक विजय आंभिरे, तालुका प्रमुख श्रावण खरपडे,उपशहर प्रमुख साईनाथ नवले, हितेंद्र चोथे, पप्पू सावंत, जनकल्याण पतसंस्थेचे संचालक अनिल दवणे ,नरेश महाले मा.उप शहर प्रमुख निलेश फलटणकर,युवा सेनेचे सागर जाधव, अभिषेक यादव तसेच वाहतूक सेनेचे अध्यक्ष अमित आयरे, नितीन कदम,मयूर पहाडी मुस्लिम विभागाचे शकील कुनमाळी ,आसिफ घाची,अझर फरास,अन्नू आत्तार आदी.शिवसैनिक कार्यक्रमास उपस्थित होते.अखेर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता होऊन सर्व शिवसैनिकांना पेढे वाटून वर्धापन दिनाचा जल्लोष साजरा करण्यात आला.






