Home नाशिक महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लागते —संगीता तावरे

महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लागते —संगीता तावरे

182

आशाताई बच्छाव

IMG-20230618-WA0070.jpg

महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लागते —संगीता तावरे

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गट हे महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे साधन असून बचत गटाच्या माध्यमातून बचत करून कर्ज रुपाने आपल्या व्यवसायासाठी अथवा घरातील शुभ कार्यासाठी अत्यल्प व्याजाने कर्ज दिले जात असल्याने बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच हातभार लागतो असे प्रतिपादन क्रांती महिला बचत गटाच्या अध्यक्ष संगीता तावरे यांनी केले आहे.
मांडवगण फराटा तालुका दौंड येथे आयोजित महिला बचत गट सत्कार समारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
मांडवगण फराटा तालुका दौंड येथे पुण्याई मंगल कार्यालय या ठिकाणी आपला जन आवाज न्यूज चैनल (80% महिला ग्रुप )च्या वतीने महिला बचत गटाचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री औदुंबर फटाले & सौ अंजली फटाले – यांनी मांडवगण फराटा भागातील बचत गटांचे काम हे चांगले व कर्जफेड 100% करून घेतले जाते या सर्व बचत गटांची जबाबदारी असणाऱ्या पंचायत समिती माध्यमातून ब्राह्मणे शिल्पा जी (b-m-m)-! यांनी मांडवगण फराटा येथील बचत गटांना उत्तम मार्गदर्शन केले तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. विनम्र सेवा बचत गटाचे चांगले काम करणाऱ्या सौ वैशाली हनुमंत मंडलिक, सौ स्वाती सुरेश महाडिक ,कदम सुनिता अशोक या-3-(c-r-p) महिलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री ढवळे( वडगाव रासाई ) यांनी केले .या कार्यक्रमासाठी मांडवगणच्या प्रथम नागरिक सरपंच सौ समीक्षा अक्षय फराटे (पाटील) लक्ष्मण बापू फराटे, भाऊ कोकरे यांनी व पंचायत समितीच्या वतीने ब्राह्मणे शिल्पा जी यांनी महिलांना मार्गदर्शन व बचत गटाची माहिती सांगितली. सौ वैशाली महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. क्रांती महिला बचत गटाच्या अध्यक्ष संगीता तावरे, सचिव सुवर्णा मारणे यांनी आलेल्या महिलांना बचत गटाची यशोगाथा यशस्वी वाटचाल 25 वर्षाचा अनुभव याबाबत माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी जिजाऊ लोकसचालित साधन केंद्र शिरूर मनेजर ललिता पोळ, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कोकडे, रामदास खराडे, हनुमंत मंडलिक गायकवाड, त्रिशाला सय्यद रुकसाना मारणे खुशाली कोकडे, लीला कोकडे ,अलका राऊत, विजया मारणे, प्रमिला हिना आदी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी पुण्याई मंगल कार्यालय मालक संभा आप्पा फराटे ( पुण्याई उद्योग समूह अध्यक्ष) यांनी कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले त्याबद्दल आपला जन आवाज न्यूज चैनल (80% महिला ग्रुप ) च्या वतीने अभिनंदन केले. कार्यक्रमाचे शेवटी सौ अंजली फटाले यांनी आलेल्या महिलांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleसेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा : भाई रामदास जराते यांचे आवाहन
Next articleबार्शी वैराग रोडवर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.