Home नांदेड जुना लोहा नवीन आबादी येथील झुकलेले विद्युत तार महावितरणने तात्काळ काढावे ;...

जुना लोहा नवीन आबादी येथील झुकलेले विद्युत तार महावितरणने तात्काळ काढावे ; आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोसकर यांनी अभियंत्यांना दिले निवेदन

138

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0034.jpg

जुना लोहा नवीन आबादी येथील झुकलेले विद्युत तार महावितरणने तात्काळ काढावे ; आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोसकर यांनी अभियंत्यांना दिले निवेदन
अंबादास पाटिल पवार
लोहा / प्रतिनिधी
लोहा शहरातील जुन्न लोहा नवीन आबादी येथील झुकलेले विद्युत तार महावितरणने तात्काळ काढावेत अशी मागणी आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोसकर यांनी लोहा येथील म.रा. वि. महावितरणच्या अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद की, जुना लोहा नवीन आबादी येथील मुख्य रस्त्यालगत विद्युत तार खाली झुकले असुन ते तार गल्ली मध्ये छोट्या मोठ्या वाहनांना लागत असुन ते हालत आहेत त्यामुळे या रस्त्यावरुन ये -जा करणाऱ्या नागरिकांना भिती वाटत असुन हे विद्युत तार तुटून खाली पडला तर जीवीतहाणी झाल्याशिवाय राहणार नाही तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाताना व वयोवृध्दाना रस्त्याच्या बाजूने रस्ता भिती निर्माण होऊन रस्ता शोधत चालावे लागत आहे.
तेव्हा याकडे महावितरणच्या अभियंत्यांने तात्काळ लक्ष देऊन सदरील लोबकळलेले विद्युत तारा तात्काळ काढाव्यात अशी मागणी आझाद ग्रुपच्या वतीने आझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोसकर यांनी महावितरणच्या अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Previous articleअवैध वाळू माफियांच्या मालमत्तांवर बसवणार बोजे : जिल्हाधिकारी अमल मित्तल
Next articleजिल्हापरिषद गट निहाय “शासन आपल्या दारी” उपक्रम राबवावा – ज्ञानेश्वर प्रेमलवाड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.