Home गडचिरोली आलापल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा : शेकापच्या महिला नेत्या जयश्री...

आलापल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा : शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांची मागणी

259

आशाताई बच्छाव

IMG-20230612-WA0012.jpg

आलापल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा : शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांची मागणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) : –एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर आलापल्ली येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास करुन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मेलव्दारे सादर केलेल्या निवेदनात जयश्री वेळदा यांनी म्हटले आहे की, आलापल्ली बलात्कार प्रकरणात सहभागी आरोपी हे धार्मीक व जातीय तेढ निर्माण करणा-या संघटनेशी संबंधीत असल्याचे बोलल्या जात असल्याने आरोपींवर बलात्कार, बाल लैंगिक शोषण कायद्यासह ॲक्ट्रोसिटी एक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच या निषेधार्ह प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे काय? याचाही तपास करावा, अशीही मागणी जयश्री वेळदा यांनी केली आहे.

Previous articleविष्णू लोखंडे यांचे निधन अंबादास पाटिल पवार
Next articleसंतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे दापोडीत आगमन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.