आशाताई बच्छाव
डांगसौंदाणे,(विजय बागुल प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कार्यालय बुंधाटे १/६/२०२३ वार गुरुवार रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्राम स्तरावरील विविध समित्यांची नूतन स्थापना करण्यात आली यामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती , ग्राम दक्षता समिती , महिला बचत गट नियोजन समिती अश्या विविध समित्या घटीत झाल्या यांमध्ये तरूण पिढीला पुढे येण्याचे एक व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य ग्रामपंचायत मार्फत मिळाले.. त्याचप्रमाणे गावात लवकरच पूर्णतहा दारूबंदी व्हावी यासाठी सरपंच व उपसरपंच स्वतःजातीने लक्ष घालून दारू विक्री करताना आढलून आल्यास त्याची तक्रार उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनाकडे देणार आहेत. पावसाळा सुरू होणार असून गावातील सांडपाण्याच्या गटारींचे स्वछता त्याचप्रमाणे आरोग्याविषीयी रोगराई पसरू नये जंतुनाशक औषधांची फवारणी करणे अश्या विविध कामांचे नियोजन करण्यात झाले. ग्रामसेवक सरपंच उपसपंच व आजी माजी सदस्य सर्वांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना गावाच्या विकासाला अजुन कश्याप्रकारे चालना देता येईल याचे मार्गदर्शन केले व ग्रामस्थांच्या अडचणी सोडवून त्याचे निरासरण करण्यात आले. योग्य पद्धतीने ग्रामसभेची समाप्ती झाली.






