Home जालना स्वराज्य संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी विश्वभंर तिरूखे

स्वराज्य संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी विश्वभंर तिरूखे

144

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0074.jpg

स्वराज्य संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी विश्वभंर तिरूखे
जालना (दिलीप बोंडे) ः पुणे येथे युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्याहस्ते आणि करण गायकर, आप्पासाहेब कुडेकर व पंकज जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्ष संघटनेच्या जालना जिल्हाप्रमुखपदी विश्वभंर तिरूखे यांची नियुक्ती करण्यात आली.
या संदर्भात देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रकात म्हटले की, स्वराज्य संघटनेत आपण कार्यकर्ता म्हणुन समाधानकारक कार्य केलेले आहे. तसेच प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेऊन संघटन बांधणीची माहिती घेतली. त्यामुळे स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशावरुन आपली स्वराज्य पक्ष जालना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात येते आहे.
आपण या पदाचा स्वीकार करुन समाज उपयोगी व सर्वांना प्रेरक असे कार्य करावे. या निवडीबद्दल स्वराज्य संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.