Home नांदेड सर्वसाधारण नागरिकांना सहाशे रुपयांत मिळणार वाळू. जनतेचे स्वप्न होणार साकार

सर्वसाधारण नागरिकांना सहाशे रुपयांत मिळणार वाळू. जनतेचे स्वप्न होणार साकार

142

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0038.jpg

सर्वसाधारण नागरिकांना सहाशे रुपयांत मिळणार वाळू.

जनतेचे स्वप्न होणार साकार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

देगलूर:सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपयात एक ब्रास वाळू देण्याचे स्वप्न शासनाने दाखविले होते. १ मे पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यामुळे तालुक्यातील अनेकांनी आपल्या घराचे बांधकाम थांबवून या शासकीय वाळू डेपोची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर २२ मे रोजी शेवाळा येथील वाळू डेपोचे उद्घाटन करण्यात देगलूरकरांना लवकरच सहाशे रुपयात एक ब्रास वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात सात ठिकाणी असे वाळू डेपो उभारण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला होता.
त्यापैकी देगलूर तालुक्यातील शेवाळा याठिकाणी वाळू डेपो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आशिक अहमद शेख (रा. बेटमोगरा) या कंत्राटदारास ४० हजार ब्रास वाळूची परवानगी देण्यात आली आहे. या वाळूडेपोचे नुकतेच प्रभारी जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम, बिलोलीचे तहसीलदार निळे, देगलूरचे नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड,मंडळ अधिकारी पुष्पलवार, तलाठी ठाकूर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे विजय महाजन, देगलूरचे कावळगडे, मसु हंबर्डे हे उपस्थित होते शासनाच्या निर्णयानुसार सहाशे रुपयांना एक ब्रास वाळू मिळण्यासाठी नागरिकांना सेतू सुविधा केंद्रावर बांधकाम परवानगी यासह पत्ता दर्शविण्यासाठी आधार कार्डची ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर बांधकाम परवानगीनुसार लागणारी वाळू सहाशे रुपये ब्रासप्रमाणे व सदरील वाळू दिलेल्या ठिकाणावर घेऊन येण्यासाठी लागणारे वाहतूक खर्च वेगळा द्यावा लागणार आहे. असे महसूल यंत्रणांनी सांगण्यात आले.

Previous articleअखिल भारतीय वारकरी मंडळ अक्कलकोट व समर्थ नगरी प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी मंच नागपुर शहराला “स्वामी सेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर-
Next articleरस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत लोखनिज वाहतूक बंद करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.