Home जालना जालना महानगरपालिकेची घोषणा; हिंदु महासभेच्या पाठपुराव्याचे यश – सुर्यवंशी

जालना महानगरपालिकेची घोषणा; हिंदु महासभेच्या पाठपुराव्याचे यश – सुर्यवंशी

173

आशाताई बच्छाव

IMG-20230510-WA0043.jpg

जालना महानगरपालिकेची घोषणा; हिंदु महासभेच्या पाठपुराव्याचे यश – सुर्यवंशी
जालना । दिलीप बोंडे – गेल्या अनेक महिन्यांपासून जालना महानगर पालिका व्हावी यासाठी हिंदु महासभेच्यावतीने वारंवार निवेदने देऊन, आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालय ते थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला याला यश आले असल्याची भावना हिंदु महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. जालना नगर पालिकेचे महानगर पालिकेत रुपांतर होण्यासंदर्भात आदेश राज्य सरकारने काढले. त्यानंतर श्री सुर्यवंशी यांनी ही भावना व्यक्त केली. ते बुधवार (दि 10) प्रसार माध्यमांशी बोलत होते.
श्री सुर्यंवशी यावेळी म्हणाले की, जालना नगर पालिकेची महानगर पालिका व्हावी यासाठी पहिली मागणी हिंदु महासभेने केली. यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर तसेच विभागीय स्तरावर आणि मंत्रालयापर्यंत यासाठी पाठपुरावा केला. वेळोवेळी निवेदने दिले. तसेच चार महिन्यांपुर्वी महापालिका व्हावी यासाठी आंदोलन ही केले. मंत्रालय पातळीवर भेट देऊन ही मागणी केली होती. त्याच दरम्यान, संबंधीत अधिकार्‍यांनी याबाबत अहवाल मागवत असल्याचे सांगून यावर सकारात्मक विचार करणार असल्याचे आपणास सांगितले असल्याचेही श्री सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. जालना महानगर पालिकेचे मागणी करत असतांना महापालिका होणार असल्याचा विश्‍वासही निर्माण होत होता. जालन्यातील विविध राजकीय, सामाजिक, विविध संघटनांचा आपल्या मागणीला जाहिर पाठींबा मिळत होता. राज्य शासनाकडून निघालेले आदेश पाहिल्यानंतर हिंदु महासभेच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची भावना यावेळी श्री सुर्यवंशी यांनी व्यक्त केली.

Previous articleसिबिल स्कोर मागितल्यास बँक विरुद्ध फौजदारी, देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.
Next articleरायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिस्तबद्ध तयारी करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.